मालेगावी कास्ट्राईब संघटनेतर्फे कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 18:30 IST2020-08-22T18:28:57+5:302020-08-22T18:30:14+5:30

मालेगाव : कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने मालेगाव येथे कोविड योद्धायोद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.

Coronary Warriors honored by Malegaon Castribe Association | मालेगावी कास्ट्राईब संघटनेतर्फे कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

मालेगावी कास्ट्राईब संघटनेतर्फे कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

ठळक मुद्देकोविड योद्धायोद्ध्यांचा सन्मान

मालेगाव : कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने मालेगाव येथे कोविड योद्धायोद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य नानासाहेब पटाईत होते. याप्रसंगी कोरोनाकाळात हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरात सेवा बजावणारे पोलीस कर्मचारी बापूसाहेब देवरे, आशा कर्मचारी सरला सुपारे, परिचारिका शोभा साबळे, आरोग्यसेवक रावसाहेब पटाईत, सिद्धार्थ सुपारे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक भास्कर शिंदे यांनी केले. यावेळी सुनील खरे, बाळासाहेब डांगळे, प्राचार्य रमेश पवार, भगवान पानपाटील, बोराळे बाबा, दादा शिरसाठआदी मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयश्री पवार, प्रशांत पवार, सविता पटाईत, राजरत्न पवार, नंदलाल सुपारे आदींनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Coronary Warriors honored by Malegaon Castribe Association