कोरोनामूळे ऊसतोड मजुर चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 17:00 IST2020-09-07T16:58:32+5:302020-09-07T17:00:32+5:30
कवडदरा : कोरोना हटण्याचे नाव घेत नसल्याने नवा गळीत हंगाम सुरळीत सुरू होणार आहे. परंतु कोरोना विषाणूमुळे ऊसतोड मजूर चिंतेत तसेच कारखानदारही चिंतेत आहेत. त्यामुळे ऊसतोड मजुरांना शेतावर आणणे हे कारखान्यांसमोरचे आव्हान ठरणार आहे.

कोरोनामूळे ऊसतोड मजुर चिंतेत
कवडदरा : कोरोना हटण्याचे नाव घेत नसल्याने नवा गळीत हंगाम सुरळीत सुरू होणार आहे. परंतु कोरोना विषाणूमुळे ऊसतोड मजूर चिंतेत तसेच कारखानदारही चिंतेत आहेत. त्यामुळे ऊसतोड मजुरांना शेतावर आणणे हे कारखान्यांसमोरचे आव्हान ठरणार आहे.
यंदा घोटी खूर्द, साकूर, पिंपळगाव, शेणीत परीसरात ऊस गळतीसाठी उपलब्ध आहे. खाजगी साखर कारखाने गळीत हंगाम होणार असून बहुतांश ऊसतोड मजूर हे बाहेर गावातील असतात. चालू गळीत हंगामासाठी ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांच्या मुकादमांनी साखर कारखान्यांशी नेहमीप्रमाणे करार करून अॅडव्हान्सही उचललेला आहे.
यंदा बहुतेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. शिवाय कोरोनाच्या भितीमुळे मजूर यंदा बाहेर पडण्याची शक्यता कमी असल्याची चिन्हे आहेत. ऊसतोड मजूर गळीत हंगामात लागतात. बीड, अहमदनगर जिल्ह्यांतून ऊसतोडीसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या सर्वाधिक असते. परंतु कोरोना विषाणूमुळे ऊसतोडणी मजूर चिंतेत असून ऊस कारखान्याने मजूराची सुरक्षा हमी घ्यावी अशी मागणी ऊस तोडणी मजूराकडून होत आहे.