मोठा दिलासा! आठवडाभरात तिसऱ्यांदा कोरोना बळी शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 16:38 IST2021-12-25T16:37:06+5:302021-12-25T16:38:34+5:30
नाशिक - जिल्ह्यात आठवडाभरात तिसऱ्यांदा कोरोना बळी शून्य झाल्याचा अल्पसा दिलासा आरोग्य यंत्रणेला मिळाला आहे. या आठवड्यात २० डिसेंबर, ...

मोठा दिलासा! आठवडाभरात तिसऱ्यांदा कोरोना बळी शून्य
नाशिक - जिल्ह्यात आठवडाभरात तिसऱ्यांदा कोरोना बळी शून्य झाल्याचा अल्पसा दिलासा आरोग्य यंत्रणेला मिळाला आहे. या आठवड्यात २० डिसेंबर, २२ डिसेंबरला यापूर्वी कोरोना बळी शून्य होते. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी (दि.२४) तिसऱ्यांदा कोरोना बळी शून्य असून, ६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर ४८ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत.
जिल्ह्यात दिवसभरात एकही कोरोनाबळी न गेल्याने एकूण बळींची संख्या ८७४८ वर कायम राहिली आहे. नव्याने बाधित झालेल्या ४८ रुग्णांमध्ये ३४ नाशिक मनपा क्षेत्रातील, तर १४ नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना उपचारार्थींची संख्या ४८२ असून त्यात नाशिक मनपा क्षेत्रातील २५५, नाशिक ग्रामीणचे २१७, तर मालेगाव मनपा आणि जिल्हाबाह्य प्रत्येकी पाच रुग्णांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण १५८२ असून, त्यात १३७८ नाशिक ग्रामीण, १४१ नाशिक मनपा, ६३ मालेगाव मनपाचे आहेत.