जिल्ह्यात कमी होईना कोरोना विषाणूची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:58 IST2020-07-18T20:41:58+5:302020-07-19T00:58:16+5:30
येवला : तालुक्यातील भायखेडा येथील ३० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून शहरातील दोन बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. बाधितांच्या संपर्कातील १८ संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी आरोग्य यंत्रणेने घेतले आहे.

जिल्ह्यात कमी होईना कोरोना विषाणूची दहशत
येवला : तालुक्यातील भायखेडा येथील ३० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून शहरातील दोन बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. बाधितांच्या संपर्कातील १८ संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी आरोग्य यंत्रणेने घेतले आहे.
तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २०४ झाली असून यापैकी आजपर्यंत १६८ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत १५ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. बाधित अॅक्टीव्ह रूग्ण संख्या २१ असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी सांगीतले. २१ बाधितांपैकी नाशिक येथील रूग्णालयात ८, बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षात ७ तर नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे ६ रूग्ण उपचार घेत आहेत. याबरोबरच बाभुळगाव येथील विलगीकरण कक्षात १८ हायरिस्क संशयीत रूग्ण कोरंटाईन असल्याची माहितीही डॉ. गायकवाड यांनी दिली.
---------------
मार्कण्डेय पर्वतावरील यात्रा रद्द
ओतुर : कळवण तालुक्यातील ओतुरपासुन पाच किलोमीटर अंतरावर असलेला मारकण्डेय पर्वतावर सोमवती अमावास्येला भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळवणचे तहसीलदार बंडू कापसे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. तसेच पर्वतावर जाणारा रस्ता बंद केला आहे. कळवणचे पोलीस निरीक्षक प्रमोदजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.