Corona Vaccination : किशोरवयीन मुलांचे लसीकरण; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते शुभारंभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 15:39 IST2022-01-03T15:36:34+5:302022-01-03T15:39:00+5:30
Corona Vaccination : केंद्र शासनाने सुरू केलेल्या या मोहिमेत किशोरवयीन मुलांनी जास्तीतजास्त लसीकरण करून घ्यावे असे आवाहन डॉ भारती पवार यांनी यावेळी केले.

Corona Vaccination : किशोरवयीन मुलांचे लसीकरण; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते शुभारंभ!
नाशिक : केंद्र शासनाच्या वतीने १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना आजपासून (दि.३) कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालयात आज सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते या मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी उपस्थित होते.
केंद्र शासनाने सुरू केलेल्या या मोहिमेत किशोरवयीन मुलांनी जास्तीतजास्त लसीकरण करून घ्यावे असे आवाहन डॉ भारती पवार यांनी यावेळी केले. नाशिक शहरात 6 मनपा रुग्णालयात अशा प्रकारे लसीकरण सुरू करण्यात आले असून जिल्ह्यातील नाशिक साडे तीन लाख मुलांना मात्रा देण्यासाठी जिल्ह्यात ३९ लसीकरण केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. यात नाशिक महापालिका हद्दीत सहा आणि मालेगाव महापालिका हद्दीतील पाच केंद्रांचा समावेश आहे. लसीकरणात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.