Corona Updtates: Increase in number of Corona patients, restrictions in Nashik district more stringent | Corona Updtates: वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाशिक जिल्ह्यातील निर्बंध अधिक कडक; जाणूनघ्या काय सुरू काय बंद?

Corona Updtates: वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाशिक जिल्ह्यातील निर्बंध अधिक कडक; जाणूनघ्या काय सुरू काय बंद?


नाशिक- जिल्ह्यांत कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. सातत्याने आवाहन करूनही गर्दीवर नियंत्रण आणणे अवघड होत आहे. यामुळे आज लिल्हाधिकारी सूरज मांढरे, पालकमंत्री आणि संबंधित अधिकारी यांच्यात चर्चा झाली यानंतर, जिल्ह्यातील नाशिक, नांदगाव, मालेगाव, निफाड या 4 तालुक्यांतील सर्व शाळा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Increase in number of Corona patients, restrictions in Nashik district more stringent)

अशी असेल कोरोना नियमावली -
- नाशिक जिल्ह्यात नाशिक आणी मालेगावमधील सर्व शाळा आणी क्लासेस अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत. 
- 10वी आणि 12वीचे वर्ग पालकांच्या संमतीने 
- नाशिक, नांदगाव, मालेगाव, निफाड या 4 तालुक्यांतील सर्व शाळा अनिश्चित काळासाठी बंद
- जीवनावश्यक वस्तू संबंधित इतर सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 7 या कालावधीतच खुली राहतील.
- 15 मार्च नंतरच्या सर्व विवाहसमारंभांना परवानगी नाही.
- बार, हॉटेल्स रात्री 7 ते 9 पर्यंतच खुली राहतील.
- जीम, व्यायामशाळा, फिटनेस सेंटर्सना केवळ व्यक्तिगत वापरासाठीच परवानगी.
- सर्व धार्मिक स्थळे सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेदरम्यानच खुली राहतील. मात्र शनिवार,रविवार पूर्णपणे बंद राहतील. 
- गर्दी जमणाऱ्या राजकीय कार्यक्रमांना बंदी
- भाजी मंडईंना 50 टक्के क्षमतेनेच परवानगी

जिल्ह्यात रविवारी 563 नवीन कोरोनाबाधित -
जिल्ह्यात रविवारी तब्बल 563 नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तर 325 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. दरम्यान, नाशिक ग्रामीणमधून एका कोरोनामुळे मृत्यू झला होता. जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पाचशेहून अधिक बाधित झाले होते. अशा प्रकारे होत असलेली सातत्यपूर्ण वाढ नागरिकांच्या चिंतेत भर घालणारी आहे. 

Web Title: Corona Updtates: Increase in number of Corona patients, restrictions in Nashik district more stringent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.