शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

दिंडोरी तालुक्यात कोरोनाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 01:58 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, उपाययोजना करताना प्रशासनाची कसरत होत आहे. कोरोनाबळींची संख्या ६ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्तीसाठी आघाडीवर असणारा दिंडोरी तालुका आता कोरोनाने जवळ जवळ ४० ते ५० टक्के व्यापला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे सांगितले असतानाही जनता मनमानी करत असल्याने संकट वाढत आहे

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, उपाययोजना करताना प्रशासनाची कसरत होत आहे. कोरोनाबळींची संख्या ६ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्तीसाठी आघाडीवर असणारा दिंडोरी तालुका आता कोरोनाने जवळ जवळ ४० ते ५० टक्के व्यापला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे सांगितले असतानाही जनता मनमानी करत असल्याने संकट वाढत आहे. त्यामुळे कोरोनाने हातपाय पसरले आहे. विविध उपाययोजना केल्या आहेत. बंदोबस्त करण्यासाठी दिंडोरी तालुक्याने सर्व प्रथम आठवडे बाजार बंद केला होता.

दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढल्याने प्रशासनाची कसरततालुक्यातील जनता काम नसतानाही घरांच्या बाहेर पडत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याने रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील रुग्णांची संख्या १२६ वर पोहोचली आहे. कोरोना संशयित रग्णांच्या उपचारासाठी पिंपरखेड, बोपेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत कोविड सेंटरची स्थापना केली आहे. मात्र दिवसेंदिवस तालुक्यातील रग्णसंख्या वाढत असल्याने ही सेंटर कमी पडतील, अशी भीती व्यक्त होत आहे.ग्रामपंचायतीने वेळोवेळी कोरोना जनजागृतीचे काम केले आहे; परंतु जनता गांभीर्याने घेत नसल्यामुळे तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढला आहे. जनतेने गरज असेल तरच घराबाहेर पडावे, मास्कचा वापर करावा, डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे, असे आवाहन लखमापूरचे ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांनी केले आहे.तालुक्यात कडक उपाययोजना म्हणून सर्वच धार्मिक उत्सव, धार्मिकस्थळे, करजंवण, पालखेड, ओझरखेड, वाघाड, पुणेगाव धरण क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांना बंदी घातली होती.कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लखमापूरमध्ये रूग्णवाढीचा वेग अधिक असल्याचे दिसत आहे. कोरोनाबळींचा संख्या सहा आली आहे.

------------------आरोग्य विभागातर्फे तालुक्यात उपाययोजना म्हणून गावागावांत वेळोवेळी औषध फवारून निर्जंतुकीकरण करण्यात येते. शासकीय यंत्रणा तसेच गाव पातळीवर ग्रामपंचायतमार्फत सर्व प्रयत्न केले जातात. परंतु जनतेच्या हलगर्जी पणामुळे तालुक्यात कोरोनाचा प्रसार होत आहे. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.- डॉ. सुजितकुमार कोशिरे, दिंडोरी तालुका आरोग्य अधिकारी

टॅग्स :Nashikनाशिक