दिंडोरी तालुक्यात कोरोनाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 01:58 IST2020-07-20T21:21:05+5:302020-07-21T01:58:31+5:30

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, उपाययोजना करताना प्रशासनाची कसरत होत आहे. कोरोनाबळींची संख्या ६ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्तीसाठी आघाडीवर असणारा दिंडोरी तालुका आता कोरोनाने जवळ जवळ ४० ते ५० टक्के व्यापला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे सांगितले असतानाही जनता मनमानी करत असल्याने संकट वाढत आहे

Corona terror in Dindori taluka | दिंडोरी तालुक्यात कोरोनाची दहशत

दिंडोरी तालुक्यात कोरोनाची दहशत

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, उपाययोजना करताना प्रशासनाची कसरत होत आहे. कोरोनाबळींची संख्या ६ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्तीसाठी आघाडीवर असणारा दिंडोरी तालुका आता कोरोनाने जवळ जवळ ४० ते ५० टक्के व्यापला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे सांगितले असतानाही जनता मनमानी करत असल्याने संकट वाढत आहे. त्यामुळे कोरोनाने हातपाय पसरले आहे. विविध उपाययोजना केल्या आहेत. बंदोबस्त करण्यासाठी दिंडोरी तालुक्याने सर्व प्रथम आठवडे बाजार बंद केला होता.

दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढल्याने प्रशासनाची कसरत
तालुक्यातील जनता काम नसतानाही घरांच्या बाहेर पडत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याने रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील रुग्णांची संख्या १२६ वर पोहोचली आहे. कोरोना संशयित रग्णांच्या उपचारासाठी पिंपरखेड, बोपेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत कोविड सेंटरची स्थापना केली आहे. मात्र दिवसेंदिवस तालुक्यातील रग्णसंख्या वाढत असल्याने ही सेंटर कमी पडतील, अशी भीती व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीने वेळोवेळी कोरोना जनजागृतीचे काम केले आहे; परंतु जनता गांभीर्याने घेत नसल्यामुळे तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढला आहे. जनतेने गरज असेल तरच घराबाहेर पडावे, मास्कचा वापर करावा, डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे, असे आवाहन लखमापूरचे ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांनी केले आहे.
तालुक्यात कडक उपाययोजना म्हणून सर्वच धार्मिक उत्सव, धार्मिकस्थळे, करजंवण, पालखेड, ओझरखेड, वाघाड, पुणेगाव धरण क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांना बंदी घातली होती.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लखमापूरमध्ये रूग्णवाढीचा वेग अधिक असल्याचे दिसत आहे. कोरोनाबळींचा संख्या सहा आली आहे.

------------------
आरोग्य विभागातर्फे तालुक्यात उपाययोजना म्हणून गावागावांत वेळोवेळी औषध फवारून निर्जंतुकीकरण करण्यात येते. शासकीय यंत्रणा तसेच गाव पातळीवर ग्रामपंचायतमार्फत सर्व प्रयत्न केले जातात. परंतु जनतेच्या हलगर्जी पणामुळे तालुक्यात कोरोनाचा प्रसार होत आहे. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
- डॉ. सुजितकुमार कोशिरे, दिंडोरी तालुका आरोग्य अधिकारी

Web Title: Corona terror in Dindori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक