शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना सर्वेक्षक वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:47 IST

नांदगाव : शहरात उद्भवलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबांचे सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आशा सेविकांना सुरक्षेविषयक कुठल्याही प्रकारचे कवच देण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे. आशासेविकांनी आमदार सुहास कांदे यांचे निवासस्थान गाठून आपली भीती व्यक्त केली.

नांदगाव : शहरात उद्भवलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबांचे सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आशा सेविकांना सुरक्षेविषयक कुठल्याही प्रकारचे कवच देण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे. आशासेविकांनी आमदार सुहास कांदे यांचे निवासस्थान गाठून आपली भीती व्यक्त केली.शहरात कोरोनाचा एक रु ग्ण दगावला तर आतापावेतो चार बाधित रु ग्ण आढळून आले आहेत.रु ग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचे संपर्क शोधण्यासाठी सर्वेक्षण मोहीम सुरु झाली आहे. तीन दिवसापासून खेड्यापाड्यातून आलेल्या आशा कर्मचारी रणरणत्या उन्हात फिरून सर्वेक्षण करीत आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षितेतसाठी तालुका आरोग्य विभागाने कोणत्याही प्रकारचे सॅनिटायझर, हॅण्डग्लोव्हज व तत्सम सुविधा पुरवलेली नाही. सर्वेक्षणाचे काम आटोपले की पुन्हा गावी परत जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली जात नाही आदीतक्र ारी त्यांनी आमदार कांदे यांचेकडे मांडल्या.या प्रकरणी तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांचेकडे विचारणा केली असता, ससाणे यांनी पालिकेची जबाबदारी असल्याचे उत्तर दिले. त्यामुळे यंत्रणेतला विसंवाद दसून आला. या सर्व प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी आशा प्रवर्तक व अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाºयांसह बहुतांशी महिला सर्वेक्षकांनी सोमवारी आमदार कांदे यांच्या संपर्क कार्यालयात निवेदन सादर करीत काम बंदचाइशारा दिला. यावेळी उपस्थित शिवसेनेचे तालुकाप्रमुख व नगरसेवक किरण देवरे यांनी तहसीलदार उदय कुलकर्णी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांच्याशी संपर्क साधला.निवेदनावर ज्योती जाधव, नलिनी काकळीज, शालिनी चव्हाण, पद्मा बिडवे, योगीता अहिरे, सविता बोरसे, मोनाली चव्हाण, उषा बच्छाव, संगीता बोरसे, स्वाती खैरनार, सविता सागर, योगिनी शिंदे, इंदुमती गायकवाड, शारदा निकम, योगीता देवकर, शीतल आहेर, रोहिणी आहेर, भारती सोनवणे, मनीषा आहेर आदी अंगणवाडी व आशा कर्मचाºयांच्या स्वाक्षºया आहेत.-------------------------सुरक्षाकवचाचा खर्च करायचा कुणी?सुरक्षाकवचाचा खर्च कुणी करायचा यावर अडून बसलेल्या आरोग्याधिकारी अशोक ससाणे यांना आमदार कांदे यांनी खडे बोल सुनावताच सुरक्षा किट खरेदी करतो व मंगळवारी देतो असे ससाणे म्हणाले. दरम्यान आमदार कांदे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेत समन्वय असावा व कठोर उपाययोजना करण्यासाठी शासकीयआढावा बैठक घेण्याचीसूचना तहसीलदारांना केली आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक