शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

एनपीटीईएलच्या ऑनलाइन अभ्यासक्रम प्रमाणपत्रावर कोरोनाचा शिक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:15 IST

नाशिक : तंत्रज्ञान वर्धित शिक्षणावरील राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत विविध विद्याशाखांसाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन वेब व व्हिडिओ कोर्सेसच्या एप्रिल २०२१ मध्ये ...

नाशिक : तंत्रज्ञान वर्धित शिक्षणावरील राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत विविध विद्याशाखांसाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन वेब व व्हिडिओ कोर्सेसच्या एप्रिल २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षा कोरोनामुळे दोनदा पुढे ढकलल्यानंतर अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. या अभ्यासक्रमाशी संबंधित विद्यार्थ्यांना संस्थेने कोविड -१९ इम्पॅक्टेड जानेवारी २०२१ सेमिस्टर) असा शिक्का असलेले ऑनलाइन प्रमाणपत्र पाठविले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

तंत्रज्ञान वर्धित शिक्षणावरील राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत (एनपीटीईएल) विविध प्रकारचे २३ ऑनलाइन अभ्यासक्रम वेब आणि व्हिडिओच्या माध्यमातून पोर्टलद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही; परंतु अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर परीक्षा शुल्क आकारून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, यावर्षी कोरोना संकटामुळे एनपीटीईएलकडून या परीक्षा दोनदा पुढे ढकलल्यानंतर अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेले परीक्षा शुल्कही एनपीटीईएलने परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, एनपीटीईएलतर्फे कोणतीही पूर्वसूचना न देता संबंधित विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्र पाठविण्यात आले असून या प्रमाणपत्रावर कोरोना इम्पॅक्ट असा लाल शिक्का लगावण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी उमटत असून संस्थेने परीक्षा रद्द केली असताना अशा प्रकारचा शिक्का प्रमाणपत्रावर लगावणे कितपत योग्य आहे, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

इन्फो-

क्रेडिट पॉइंटसाठी बाटूनेही पुढे ढकलली परीक्षा

एनपीटीईएलतर्फे घेण्यात येणाऱ्या या ऑनलाइन अभ्यासक्रम प्रमाणपत्र परीक्षांच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाकडून या अभ्यासक्रमासाठी ६ गुणांचे क्रेडिट पॉइंट दिले आहे. त्यामुळे एनपीटीईएलची परीक्षा पुढे ढकलल्याने बाटूकडूनही विद्यापीठाची परीक्षा पुढे ढकलली होती. मात्र, एनपीटीईएलतर्फे एप्रिल २०२१ ची परीक्षा दोनदा पुढे ढकलून अखेर रद्द करून विद्यार्थ्यांना ‘कोविड -१९ इम्पॅक्टेड जानेवारी २०२१ सेमिस्टर’ अशा शिक्का असलेले प्रमाणपत्र पाठविल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

कोट-

एनपीटीईएलद्वारे चालविले जाणारे ऑनलाइन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगले आहेत. त्यांचा काही विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना क्रेडिट पॉइंटच्या स्वरूपात फायदाही होतो. मात्र, कोरोना संकटामुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केले असा शेरा देऊन कोविड-१९ इम्पॅक्टचा शिक्का टाळता आला असता. ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हितकारक ठरू शकले असते.

-डॉ. के. एन. नांदूरकर, प्राचार्य, के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय