शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

चैत्रोत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 2:00 AM

राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद केल्याने साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धेपीठ असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर दि. २१ ते २७ एप्रिल दरम्यान होणारा चैत्राेत्सवही रद्द होण्याची शक्यता आहे.  सलग दुसऱ्या वर्षीही चैत्रोत्सवावर कोरोनाचे सावट कायम असून  ट्रस्टने अद्याप यात्रोत्सवाबाबत अधिकृतपणे कोणताही निर्णय घेतलेला नाही.

ठळक मुद्देदेवस्थान बंद : यंदाही परंपरा खंडित होण्याची शक्यता

कळवण : राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद केल्याने साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धेपीठ असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर दि. २१ ते २७ एप्रिल दरम्यान होणारा चैत्राेत्सवही रद्द होण्याची शक्यता आहे.  सलग दुसऱ्या वर्षीही चैत्रोत्सवावर कोरोनाचे सावट कायम असून  ट्रस्टने अद्याप यात्रोत्सवाबाबत अधिकृतपणे कोणताही निर्णय घेतलेला नाही. परंतु, येत्या दोन-तीन दिवसांत यासंदर्भात बैठक होऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देवस्थानने दिली आहे. चैत्रोत्सवावर कोरोनाचे सावट पसरल्याने  यात्रेवर अवलंबून असलेल्या ग्रामस्थ, व्यावसायिक व  व्यापाऱ्यांनी धसका घेतला आहे.  सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, व्यापारी, व्यावसायिक, फ्युनिक्युलर ट्रॉली परिवहन मंडळ, खासगी वाहतूक आदी सर्व व्यवसायाला सलग दुसऱ्या वर्षी आर्थिक फटका बसणार असल्यामुळे यंदाही कोट्यवधींची उलाढाल ठप्प होण्याची शक्यता आहे.  आदिमाया सप्तशृंगीचा वर्षभरातील वेगवेगळ्या उत्सवांपैकी एक प्रमुख उत्सव असलेला चैत्रोत्सव २१ ते २७ एप्रिल दरम्यान होत आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा उत्सवही रद्द होण्याच्या मार्गावर आहे.  मागील वर्षी राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून प्रशासनाने ११  मार्चपासून मंदिरे दर्शनासाठी बंद केल्याने तेव्हाही चैत्रोत्सव रद्द केला होता. दरवर्षी चैत्रोत्सवासाठी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व इतर राज्यांतून सुमारे दहा लाखांवर भाविक हजेरी लावतात. यात खानदेशातून तीन ते चार लाख भाविक पदयात्रेने येण्याची परंपरा होती. ती कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही खंडित  होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, देवस्थान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मंदिरे बंदच असून चैत्रोत्सवाबाबत ट्रस्टची बैठक होऊन निर्णय घेतला जाणार आहे.ऑनलाइन दर्शनाची  भाविकांसाठी सुविधामंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी आदिमायेची नित्य दैनंदिन पूजाविधी सुरू असून, देवीचे घरबसल्या दर्शन व्हावे  यासाठी लाइव्ह ऑनलाईन दर्शन सुविधा ट्रस्टच्या वेबसाईट व सोशल मीडियाच्या माध्यमातून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने अगोदरपासूनच उपलब्ध करून दिली आहे. तसेच व्हॉट्सॲप , फेसबुकद्वारे आदिमायेच्या मूर्तीचा दररोजचा फोटो नियमित प्रसारित करण्यात येत आहे.  राज्यातील व जिल्ह्यातील वाढती कोविड संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन भाविकांनी स्वतःच्या व कुटुंबीयांच्या सुरक्षितेसाठी घरात बसूनच आदिमायेचे दर्शन घेण्याचे आवाहन सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकsaptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिर