नगरसुलला पोळा सणावर कोरोनाचे सावट शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 17:03 IST2020-08-17T17:00:25+5:302020-08-17T17:03:20+5:30
नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील आठवडे बाजार बंद व कोरोनाचया भितीने बाहेर शहराच्या ठिकाणी न जाता गावातच पोळ्याचा बाजार करावा लागतो आहे.

नगरसुलला पोळा सणावर कोरोनाचे सावट शेतकरी संकटात
नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील आठवडे बाजार बंद व कोरोनाचया भितीने बाहेर शहराच्या ठिकाणी न जाता गावातच पोळ्याचा बाजार करावा लागतो आहे. परिसरात यावर्षी संकट असल्याने पोळा सणावर कोरोनाचे संकटामुळे शेतकऱ्यांना बैलांच्या. साज बाजारपेठत न घेता गावातील दुकान दाराकडुन तोंड मागल्या किमती मध्ये बैलाचा साज घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे नगरसुल व परिसरात शुक्रवारचा आठवडे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना ठराविक दुकानदारांकडून बैलांचा तोंडमागल्या किमती मध्ये घेण्याची वेळ आली असल्याने शेतकरी वर्ग आधीच कांद्याचे रोपं खराब झाली असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडले आहे. शेतकऱ्यांसमोर पावसामुळे पिके संकटात सापडले आहे. बाजार बंद असल्यामुळे अनेक संकटांचा सामना बळीराजाला मोठ्या प्रमाणावर बसत आहे मोरखी,वेसन,बेगड,माठोठी,चराठ,चवर,घाटी घोगर,आदी साज घेण्यासाठी घेण्यासाठी किमती वाढल्या असल्याने सर्जा राजा सजवण्यासाठी शेतकऱ्यांना काटकसरीने बैलपोळा साजरा करण्याची वेळ आली शेतकऱ्यांवर आली आहे. सण हा पोळ्याचा मान असे बैलाचा या म्हणी प्रमाणे शेतकऱ्यांना आपल्या लाडक्या सर्जा राजा पोळ्याच्या दिवशी साजरे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाले आहे नगरसुल हा जवळपासच्या खेडेगावाच्या मोठा बाजार असल्याने बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी अडचणी निर्माण झाले आहे.