उत्तर महाराष्ट्रात कोरोनामुक्तीचे प्रमाण ९२.४० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 01:24 AM2020-10-19T01:24:21+5:302020-10-19T01:24:45+5:30

उत्तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितींची संख्या दोन लाखांवर गेली असली तरी बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता आठवडाभरात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९२.४० टक्के इतके झाले आहे. गेल्या आठवड्यात ९०.०५ टक्के इतके हे प्रमाण होते त्यात आता सुमारे दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Corona release rate in North Maharashtra is 92.40 percent | उत्तर महाराष्ट्रात कोरोनामुक्तीचे प्रमाण ९२.४० टक्के

उत्तर महाराष्ट्रात कोरोनामुक्तीचे प्रमाण ९२.४० टक्के

Next
ठळक मुद्देमृत्युदर ‘जैसे थे’ : १ लाख ९६ हजार रु ग्ण झाले बरे; बाधितांच्या संख्येत घट

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितींची संख्या दोन लाखांवर गेली असली तरी बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता आठवडाभरात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९२.४० टक्के इतके झाले आहे. गेल्या आठवड्यात ९०.०५ टक्के इतके हे प्रमाण होते त्यात आता सुमारे दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विभागात कोरोनाबाधितांची संख्या २ लाख १३ हजार इतकी झाली आहे. त्यातील १ लाख ९६ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. कोरोनाबाधितांची संख्या घटत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र कायम आहे. गत आठवड्याप्रमाणेच उत्तर महाराष्ट्राचा मत्युदर मात्र १.९४ टक्के इतका कायम आहे. उत्तर महाराष्ट्रात सध्या १२ हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या चोवीस तासांत १ हजार १०९ नवीन बाधित आढळले, तर १००६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच ३४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत ४ हजार १२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आत्तापर्यंत ४ हजार १२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण नाशिक जिल्'ाात आढळले आहेत. जिल्'ात मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत ८८ हजार ८६१ रुग्ण आढळले. त्यापैकी ८० हजार १२३ रुग्ण बरे झाले, तर १५९१ जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्'ात हजार १४७ रुग्ण उपचार घेत आहेत. नाशिक पाठोपाठ अहमदनगरमध्ये एकूण रुग्णसंख्या ५३ हजारांवर पोहोचली असून, त्यातील ५० हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले. ७९२ जणांचा मृत्यू झाला. सध्या २१२३ रुग्ण उपचार घेत आहेत. जळगाव जिल्'ातील एकूण रुग्णांची संख्या ५२ हजारांपर्यंत पोहोचली आहे. मात्र या जिल्'ात ४८ हजार ५७३ रुग्ण बरे झाले, तर १२३८ जणांचा मृत्यू झाला. सध्या जळगाव जिल्'ात २ हजार २० जण उपचार घेत आहेत. धुळे जिल्'ात बाधितांची संख्या १३ हजारपार गेली आहे.

Web Title: Corona release rate in North Maharashtra is 92.40 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.