कोरोना होऊन गेला; अन्य आजारांवरील शस्त्रक्रिया करायची कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:13 IST2021-09-13T04:13:21+5:302021-09-13T04:13:21+5:30
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र याच कालावधीत ...

कोरोना होऊन गेला; अन्य आजारांवरील शस्त्रक्रिया करायची कधी?
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र याच कालावधीत कोरोना झालेल्या बहुतांशी जणांच्या शस्त्रक्रियांचे नियोजनही रखडले आहे. दुसऱ्या लाटेतील या रुग्णांवर आरोग्यदृष्ट्या शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. पण कोरोनामुळे शस्त्रक्रिया कधी करावी याबाबतचा संभ्रम या रुग्णांमध्ये आहे. त्यामुळे अनेक नागरिकांच्या नियोजित शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. त्या करायच्या की पुढे ढकलायच्या या व्दिधा स्थितीत रुग्ण आढळून येत आहेत.
येथील जिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून दीड वर्षांपासून घोषित आहे. तेथे महिलांच्या बाळंतपणाच्या कालावधीतील सिझर ही शस्त्रक्रिया फक्त केली जात आहे. उर्वरित अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यासाठी येथील कोरोनाच्या कालावधीतही त्या केल्या जात आहेत. पण काही रुग्णांनी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह येताच दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीनंतर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जात आहे. जिल्ह्यातील रुग्ण संभ्रमावस्थेत असले तरी ती किती आवश्यक आहे, याची जाणीव करून देऊन तसा सल्ला दिला जात आहे. आवश्यक असल्यास रुग्णांची मानसिकता लक्षात घेऊन शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे निदर्शनात आले आहे.
-----
१) कोरोनाचे एकूण रुग्ण -
बरे झालेले रुग्ण -
कोरोनाचे बळी -
-------
शस्त्रक्रियेसाठी दोन महिने वाट पाहा
- कोरोना झाल्यानंतर अशक्तपणा येतो. रुग्ण मानसिकदृष्ट्या फिटनेस नसतो. कोरोनामुळे कमीत कमी १५ दिवस अशक्तपणा अधिक जाणवतो. त्यामुळे रुग्णाकडून शस्त्रक्रियेला कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे महिना ते दीड महिना उशिरा शस्त्रक्रिया करणे उत्तम आहे. या कालावधीत रुग्ण शस्त्रक्रिया करण्यासाठीं मानसिकदृष्ट्या तयार होतो. यासाठी दीड महिन्याचा सल्ला डॉक्टर देतात.
इमर्जन्सी शस्त्रक्रिया
कोरोना झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याची अत्यंत गरज असेल तर १५ दिवसांतही शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णाचा फिटनेस लक्षात घेतला जातो. फिटनेस उत्तम असल्यास एमर्जन्सीमध्ये शस्त्रक्रिया करता येते. यानुसार महिलांचे सिझर शस्त्रक्रिया कोरोना झाल्याच्या कालावधीत कराव्या लागलेल्या आहेत. अन्य शस्त्रक्रिया फिटनेस लक्षात घेऊन इमर्जन्सीमध्ये करता येतात. त्यासाठी रुग्णाची मानसिकताही तयार करावी लागते.
----
नियोजित शस्त्रक्रिया -
या प्लान शस्त्रक्रिया नेहमीच्या पद्धतीने करतात. विविध तपासण्यांसह कोरोना पाॅझिटिव्ह आहे की निगेटिव्ह ही तपासणी करावी लागते. शस्त्रक्रिया करण्यासाठी भूल द्यावी लागते. यानंतर रुग्णाकडून शस्त्रक्रिया करताना उत्तम प्रतिसाद मिळेल आदी खात्री करून घ्यावी लागते. त्यानंतर प्लान शस्त्रक्रिया केली जाते.
--------
इन्फो
कोरोनाच्या कलावधीत इमर्जन्सीमध्ये महिलांचे सिझर ऑपरेशन करावे लागले आहे. रुग्णाची मानसिकता आणि शस्त्रक्रियेची गरज लक्षात घेऊन रुग्णाच्या नातेवाइकास योग्य सल्ला देऊन डॉक्टरांना निर्णय घ्यावा लागतो. तातडीची गरज असल्यास संबंधित डॉक्टर्सना तत्काळ निर्णय घेऊन शस्त्रक्रिया करण्याशिवाय तरणोपाय नसतो.