रुग्णवाढीसह कोरोनामुक्त समान पातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:15 IST2021-05-10T04:15:04+5:302021-05-10T04:15:04+5:30
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी (दि. ९) एकूण ३००२ रुग्णांची वाढ झाली, तर ३०२५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी ...

रुग्णवाढीसह कोरोनामुक्त समान पातळीवर
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी (दि. ९) एकूण ३००२ रुग्णांची वाढ झाली, तर ३०२५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, एकूण ४० रुग्णांचा बळी गेल्याने बळींची एकूण संख्या ३,८६५वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये १,५८४, तर नाशिक ग्रामीणला १२२० आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ११५ व जिल्हाबाह्य ८३ रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ११, ग्रामीणला २६ , मालेगाव मनपा तीन असा एकूण ४० जणांचा बळी गेला आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने चाळीसच्या आसपास असून, रविवारीदेखील ४० नागरिकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभाग विवंचनेत पडला आहे.
इन्फो
प्रथमच ग्रामीणचे उपचारार्थी रुग्ण अधिक
जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या बाधितांच्या समकक्ष आली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ३३,१७५वर पोहोचली आहे. त्यात १५ हजार ३१५ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १५ हजार ८७७ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, एक हजार ६०५ मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य ३७८ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत प्रथमच ग्रामीणचे विद्यमान उपचारार्थी रुग्ण शहरापेक्षा अधिक झाले आहेत.