रुग्णवाढीसह कोरोनामुक्त  समान पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 01:55 IST2021-05-10T01:55:04+5:302021-05-10T01:55:25+5:30

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी (दि. ९) ३००२ रुग्णांची वाढ झाली. ३०२५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ४० रुग्णांचा बळी गेल्याने बळींची संख्या ३,८६५वर पोहोचली आहे.

Corona-free at the same level with morbidity | रुग्णवाढीसह कोरोनामुक्त  समान पातळीवर

रुग्णवाढीसह कोरोनामुक्त  समान पातळीवर

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी (दि. ९) ३००२ रुग्णांची वाढ झाली. ३०२५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ४० रुग्णांचा बळी गेल्याने बळींची संख्या ३,८६५वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात मनपा क्षेत्रामध्ये १,५८४, तर ग्रामीणला १२२० आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ११५ व जिल्हाबाह्य ८३ रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ११, ग्रामीणला २६ , मालेगाव मनपा तीन असा एकूण ४० जणांचा बळी गेला आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने चाळीसच्या आसपास असून, रविवारीदेखील ४० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या बाधितांच्या समकक्ष आली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ३३,१७५वर पोहोचली आहे. त्यात १५ हजार ३१५ रुग्ण मनपा क्षेत्रातील, १५ हजार ८७७ रुग्ण ग्रामीणमधील, एक हजार ६०५ मालेगाव क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य ३७८ रुग्णांचा समावेश आहे. 

Web Title: Corona-free at the same level with morbidity