शहरं
Join us  
Trending Stories
1
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
2
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
3
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
4
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
5
अल्काराझ-सिनर जोडीसमोर निभाव लागेना! प्रत्येक वेळी दोघांपैकी एक येतोय जोकोच्या आडवा
6
‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार
7
Viral Video : पोर्शमध्ये आई तर फॉर्च्युनरमध्ये मुलगा, रस्त्यावर लागली भन्नाट रेस! व्हिडीओ बघून व्हाल थक्क
8
घोड्यांचे रक्त पाजून ब्राझीलच्या फॅक्टरीत दररोज तयार केले जातात कोट्यवधी मच्छर; कारण काय?
9
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...
11
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   
13
राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
14
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!
15
१ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का?
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
17
"घाबरू नका, प्रत्येक समस्येचे निराकरण होईल"; CM योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना दिला धीर
18
केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही
19
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
20
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा

कोरोनामुळे वाटा बंद : आता डोळ्यांपुढे काजवे चमकणार नाहीत !

By अझहर शेख | Updated: May 28, 2020 17:05 IST

पर्यटकांनी कुठल्याही छुप्या मार्गाने अभयारण्यक्षेत्रात प्रवेश केल्यास वन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देमागील वर्षी ७ लाख ६४ हजार ६४० रुपयांचा महसूल पर्यटनाच्या हंगामावर पाणीकोरोना या साथीच्या आजारामुळे ‘पाहुणे’ येणे बंद

नाशिक : कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात मेअखेर काजव्यांची चमचम पहावयास मिळते. वळव्याच्या पावसानंतर येथील वृक्षराजीवर जणु तारकादळे लखलखते; मात्र यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली काजवा महोत्सव सापडला आहे. रोजगार बुडाला तर चालेल; मात्र काजवा महोत्सवाद्वारे कोरोनाला निमंत्रण द्यायचे नाही, असा कठोर निर्णयच या वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावांच्या गावकऱ्यांनी ठरावाद्वारे घेतला. नाशिक वन्यजीव विभागानेदेखील मागील दोन महिन्यांपासून अभयारण्याची वाट पर्यटकांसाठी बेमुदत कालावधीसाठी बंद केली आहे.नाशिक-अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील भंडारदरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणा-या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात यावर्षी काजवा महोत्सव पार पडणार नसल्याचे नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी जाहीर केले आहे. पर्यटकांनी कुठल्याही छुप्या मार्गाने अभयारण्यक्षेत्रात प्रवेश केल्यास वन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्याकरिता नाशिक वनवृत्तासह राज्यभरातील अभयारण्य, राखीव वने प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशान्वये दोन महिन्यांपासून बेमुदत बंद ठेवण्यात येत आहेत.

दरवर्षी मे अखेरीस कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील अर्जुनसादडा, उंबर, जांभूळ, बेहडा, हिरडा, सादडा यांसारख्या वृक्षराजीवर काजव्यांची चमचम अनुभवयास येते. मान्सूनच्या सरीं कोसळेपर्यंत काजवे या भागात लुकलुकतात. रात्रीच्याअंधारात जणू धरतीवर प्रकाशफुलेच अवतरली की काय असा भास होतो. खरं तर हा कालावधी जैवविविधतेतील काजवा या किटकाचा प्रजननाचा असतो.दरवर्षी महिनभर निसर्गाचा हा अद्भूत व डोळ्यांची पारणे फेडणारा नजारा बघण्यासाठी नाशिक, अहमदनगर या जवळ्या जिल्ह्यांसह मुंबई, पुणे या शहरांमधून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होतात. तसेच गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद, भावनगर या भागातूनही पर्यटक येथे हजेरी लावतात. यावर्षी या नाशिक वन्यजीव विभागाला मिळणाºया महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. या भागातील विविध आदिवासी गाव, पाड्यांवरील सुमारे ३५० कुटुंबियांचा रोजगारही बुडणार आहे. निवास-न्याहारी, गाईड, जंगल भ्रमंती आदिंच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला दर दिवसाला या महोत्सवात किमान १ हजार तर कमाल ५ हजार रुपये मिळत होते.
साडेतीनशे आदिवासी कुटुंबाचा रोजगार बुडाला
अभयारण्य क्षेत्रातील गावांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट कोरोनामुळे आहे. येथील आदिवासींचा मुख्य व्यवसाय शेती आहे. दुसरा आधार म्हणजे पर्यटन. मात्र यावर्षी कोरोना या जीवघेण्या साथीच्या आजारामुळे ‘पाहुणे’ येणे बंद झाले. परिणामी आदिवासींचा रोजगार हिरावला गेला आहे.
मागील वर्षी सुमारे ७ लाख ६४ हजार ६४० रुपयांचा महसूल नाशिक वन्यजीव विभागाला काजवा महोत्सवाच्या माध्यमातून मिळाला होता. २०१८ सालापासून पर्यटकांकडून शुल्क आकारणी वन्यजीव विभाग करत आहे. गेल्या वर्षी २०१८च्या महोत्सवाच्या तुलनेत दहा हजाराने पर्यटक वाढले होते. यावर्षी कोरोनामुळे अभयारण्य मागील दोन महिन्यांपासून बंदच असून पुढील आदेश अद्याप प्राप्त नाही. काजवा महोत्सवदेखील वरिष्ठांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे.- दत्तात्रय पडवळे, वनक्षेत्रपाल, भंडारदरा

 

पर्यटनाच्या हंगामावर पाणीउन्हाळ्यात संध्याकाळनंतर भंडारदरा धरणाच्या काठालगत कॅम्पेनिंग, पावसाळ्याच्या तोंडावर काजवा महोत्सव आणि नंतर पावसाळी पर्यटन असा हा हंगाम असतो. या नऊ दे दहा महिन्यांत येथील आदिवासी तरुणांना चांगली कमाई होते; मात्र यंदा सगळा हंगाम संकटात सापडला आहे. साधारणत: सरासरी तीनशे ते साडेतीनशे कुटुंबांना यावर्षी मोठा आर्थिक फटका बसणार आहे. - केशव खाडे, स्थानिक गाइड

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtourismपर्यटनforest departmentवनविभागwildlifeवन्यजीव