कोरोनामुळे थंडावला टाळ, वीणा, पखवाजचा निनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 16:58 IST2021-06-20T16:55:59+5:302021-06-20T16:58:01+5:30

जळगाव नेऊर : गतवर्षीपासून कोरोनाच्या साथीने ग्रामीण भागासह शहरी भागात सुद्धा थैमान घातल्याने त्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे धार्मिक, सामाजिक, राजकीय, कार्यक्रम बंद आहेत. यामध्ये कीर्तन, प्रवचन, अखंड हरिनाम सप्ताह, हरिपाठ, इतर धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे टाळ, वीणा, पखवादाचा निनाद थांबला असून, ग्रामीण भागातील मंदिरे सुनी-सुनी वाटत आहेत.

Corona causes cold sores, harp, pakhwaj | कोरोनामुळे थंडावला टाळ, वीणा, पखवाजचा निनाद

कोरोनामुळे थंडावला टाळ, वीणा, पखवाजचा निनाद

ठळक मुद्देजळगावनेऊर : ग्रामीण भागातील मंदिरे सुनी-सुनी

जळगाव नेऊर : गतवर्षीपासून कोरोनाच्या साथीने ग्रामीण भागासह शहरी भागात सुद्धा थैमान घातल्याने त्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे धार्मिक, सामाजिक, राजकीय, कार्यक्रम बंद आहेत. यामध्ये कीर्तन, प्रवचन, अखंड हरिनाम सप्ताह, हरिपाठ, इतर धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे टाळ, वीणा, पखवादाचा निनाद थांबला असून, ग्रामीण भागातील मंदिरे सुनी-सुनी वाटत आहेत.

वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन महाशिवरात्रीपासून अनेक गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची अनेक वर्षांची परंपरा आहे. परंतु गतवर्षापासून कोरोना आजाराने थैमान घातल्यामुळे तो आजार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. एकादशीनिमित्त चालणारे गावोगावी सामूहिक भजन, कीर्तन, प्रवचन तसेच दररोज सायंकाळी गावातील मंदिरांमध्ये सामूहिक हरिपाठ उपासना चालत असतात.

याला टाळ, विणा, पखवादाची साथ असते मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीने लागू असलेल्या संचारबंदीमुळे हा निनाद थांबला आहे. मार्च महिन्यापासून अखंड हरिनाम सप्ताह, यात्रा, मेळावे, उत्सव, मोठ्या प्रमाणात चालू होतात या काळात अनेक गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची संख्या मोठ्या प्रमाणात असते. कीर्तनकार, पखवादक, विनेकरी, चोपदार, टाळकरी, प्रवचनकारही या दिवसात व्यस्त असतात, परंतु गतवर्षीपासून कोरोनामुळे संचारबंदी, तर कधी लॉकडाऊन चालूच आहे.

यामुळे सर्व सामूहिक, धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रम रद्द झाले आहेत. लोकांची गर्दी टाळण्यासाठी कीर्तनकार, प्रवचनकार कुठेही जात नाहीत. आषाढ, श्रावण महिन्यांत गावोगावी काकडा आरती, गाथा पारायण, भजन कीर्तन, प्रवचन, तसेच गावात स्नेहभोजन आदींसह दिनक्रम चालू असतात गावोगावी प्रत्येक एकादशीला रात्री संप्रदाय पंथाचे सामूहिक भजन, तर दुसऱ्या दिवशी द्वादशीला स्नेहभोजन, दररोज मंदिरामध्ये सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान सामूहिक हरिपाठ होत असतो.

त्यामुळे मंदिर परिसरात आनंदमय व भक्तिमय वातावरण निर्माण होते, पण कोरोनाच्या भीतीने व चालू असलेल्या संचारबंदीमुळे सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. काही ठिकाणी सप्ताहाची परंपरा स्थगित होऊ नये यासाठी तुकाराम गाथा पारायण, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण एकाच व्यक्तीने मंदिरामध्ये बसून त्याच तिथीवर सुरू असल्याचेही दिसून येत आहे.

Web Title: Corona causes cold sores, harp, pakhwaj