शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

डाक कार्यालयात कोअर बॅँकिंग सुविधा

By admin | Updated: October 13, 2015 22:33 IST

सिन्नर : सुमारे दोन लाख खातेदारांना आॅनलाइनचा होणार फायदा

वावी : सिन्नर तालुक्यातील सर्व उपडाक कार्यालयांत कोअर बॅँकिंग प्रणाली कार्यान्वित झाली असून, तालुक्यातील सुमारे दोन लाख खातेदारांना आॅनलाइन सुविधेचा फायदा होणार आहे.तालुक्यातील वावी येथे नुकताच कोअर बॅँकिंग प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. नाशिकरोड दक्षिण डाक विभागाचे सहायक अधीक्षक अजित सोनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सिन्नर पंचायत समितीच्या सभापती संगीता काटे यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. उपसरपंच विजय काटे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कर्पे, सब पोस्टमास्तर जे. डी. अहिरे, संगणक प्रशासक सुभाष जावडे, मेल ओव्हरसिअर एस. एन. लोखंडे आदिंसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कोअर बॅँकिंग सुविधेमुळे वावी डाक कार्यालयात खाते असणाऱ्या ग्राहकांना देशात कोठेही पैसे पाठविता किंवा काढता येणार आहेत. यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. जगातील प्रमुख बॅँका ज्या फिनॅकल तंत्रज्ञानाचा वापर करतात या तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय डाक विभागाने सदर सेवा सुरू केली आहे. त्यामुळे पोस्ट आॅफिसमधील विविध योजनेत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन सहायक अधीक्षक अजित सोनार, सब पोस्टमास्तर जे. डी. अहिरे, यांनी केले आहे. डाक विभागाची ग्रामीण डाक जीवन विमा योजना व नव्याने सुरू करण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन सोनार यांनी यावेळी केले. वावी डाक कार्यालयात सुमारे २२ हजार खातेदार असून, त्यांना कोअर बॅँकिंग सुविधेचा फायदा मिळणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. वावीसह तालुक्यातील सिन्नर, मुसळगाव, माळेगाव, नांदूरशिंगोटे या डाक कार्यालयांत कोअर बॅँकिंग प्रणाली कार्यरत झाली असून, सुमारे दोन लाख ग्राहक या सुविधेला जोडले गेले आहेत. कोअर बॅँकिंग प्रणालीच्या उद्घाटन कार्यक्रमास सेवानिवृत्त प्राचार्य भानुदास भेंडाळे, दिलीप वेलजाळी, बाळासाहेब शिंदे, किरण वर्पे, प्रशांत मांडवगणे, भगवान विधाते, सुधाकर कुलकर्णी, गणेश आनप यांच्यासह ग्रामस्थ व खातेदार उपस्थित होते. शैलेश कर्पे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. (वार्ताहर)