ठेकेदार, भागीदाराला पुन्हा पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:11 IST2019-07-12T00:10:11+5:302019-07-12T00:11:47+5:30

गौण खनिज (वाळू) वाहतुकीचे बनावट परवाने बनविणाऱ्या दोघांना छावणी पोलिसांनी गुरूवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

The contractor, the partner again the police closet | ठेकेदार, भागीदाराला पुन्हा पोलीस कोठडी

ठेकेदार, भागीदाराला पुन्हा पोलीस कोठडी

मालेगाव : गौण खनिज (वाळू) वाहतुकीचे बनावट परवाने बनविणाऱ्या व तहसील आवारातून ट्रक पळवून नेल्याप्रकरणी अटकेत असलेले संशयित आरोपी रमेश तुकाराम कटाळे रा. नाशिक व निलेश सुधाकर पाटील रा. जळगाव या दोघांना छावणी पोलिसांनी गुरूवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या ८ जुलै रोजी दोघे संशयित पोलिसांना शरण आले होते. त्यावेळी न्यायालयाने सहा दिवसांची कोठडी सुनावली होती. गुरूवारी कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी परत न्यायालयात हजर केले होते.

Web Title: The contractor, the partner again the police closet