शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

कोरोना संकटाच्या काळात कंत्राटी कर्मचारी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 10:50 PM

नाशिक : शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागांतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर असलेल्या कंत्राटीपद्धतीने कार्यरत असलेल्या सुमारे बाराशे कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली असून, ऐन कोरोनाच्या संकटकाळात ३१ जुलैनंतर या कर्मचाºयांच्या सेवा संपुष्टात आणण्याचे पत्र शासनाने सर्व जिल्हा परिषदांना पाठविले आहे. गेल्या १५ वर्षांपासून काम करणाºया कर्मचाºयांना महाविकास आघाडी शासनाकडून या कर्मचाºयांना न्याय मिळण्याची अपेक्षा असताना शासनाने आउटसोर्सिंगद्वारे सदरचे अभियान राबविण्याचे ठरविल्याने कंत्राटी कर्मचाºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्दे१३०० कर्मचारी उघड्यावर : पाणीपुरवठा विभागाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागांतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर असलेल्या कंत्राटीपद्धतीने कार्यरत असलेल्या सुमारे बाराशे कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली असून, ऐन कोरोनाच्या संकटकाळात ३१ जुलैनंतर या कर्मचाºयांच्या सेवा संपुष्टात आणण्याचे पत्र शासनाने सर्व जिल्हा परिषदांना पाठविले आहे. गेल्या १५ वर्षांपासून काम करणाºया कर्मचाºयांना महाविकास आघाडी शासनाकडून या कर्मचाºयांना न्याय मिळण्याची अपेक्षा असताना शासनाने आउटसोर्सिंगद्वारे सदरचे अभियान राबविण्याचे ठरविल्याने कंत्राटी कर्मचाºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात १५ वर्षांपूर्वी राज्यात प्रत्येक जिल्ह्णात स्वच्छता कक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये एम. एम.सी.जे., एमएसडब्ल्यू, बी.कॉम, एम.कॉम, बीई सिव्हिल, एम.एस्सी, पदवीधर अशा उच्चशिक्षित कर्मचाºयांची जाहिराती देऊन आणि लेखीपरीक्षा, मुलाखती घेऊन १२०० कंत्राटी भरती करण्यात आली. स्वच्छता अभियानाबरोबर पाणी व स्वच्छता विभागाचे उपक्रम राबविण्यात या कर्मचाºयांचा मोठा वाटा आहे. अत्यल्प मानधनात शासनाच्या कोणत्याही सुविधा नसताना शासन आपल्या कामाची दखल घेईल या आशेवर काम करीत असताना केंद्र शासनाने जलजीवन अभियान तसेच स्वच्छ भारत अभियान टप्पा-२ची घोषणा केली. या अभियानात मानधनावर काम करणाºया कर्मचाºयांची सेवा कायम करण्याऐवजी त्यांच्या सेवा खंडित करून आउटसोर्सिंगद्वारे ठेकेदार नेमून काम करण्याचा शासनाचा इरादा असल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. ठेकेदाराचे पोट भरण्यासाठी तसेच मानधनावरील कर्मचाºयांना बेरोजगार करून त्यांची ससेहोलपट करून घेण्याचे हे षडयंत्र असल्याने याबाबत कंत्राटी कर्मचाºयांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या कंत्राटी कर्मचाºयांनी आजमितीला गृहकर्ज घेतले आहे. मुलांच्या शिक्षणावर खर्च सुरू आहे. कोणी घराचे भाडे भरत आहेत. महागाईच्या काळात तुटपुंज्या वेतनात आपली व आपल्या परिवाराची उपजीविका हे ठोक मानधनावरील कर्मचारी चालवित आहेत, अशा परिस्थितीत त्यांच्यावर बेकारीची कुºहाड कोसळणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य