शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक जागृतीतून फसवणुकीवर नियंत्रण : मिलिंद सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:52 IST

ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने ग्राहक कायद्यातील बदलांविषयी ग्राहकांमध्ये जागृतीचे काम होणे आवश्यक आहे. ग्राहक आपल्या हक्कांविषयी जागृत झाला तर फसवणुकीच्या प्रकरणांवर नियंत्रण मिळविणे शक्य असून, अशाप्रकारे ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे येणाऱ्या तक्रारींच्या संख्येतही आपोआपच घट होईल

नाशिक : ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने ग्राहक कायद्यातील बदलांविषयी ग्राहकांमध्ये जागृतीचे काम होणे आवश्यक आहे. ग्राहक आपल्या हक्कांविषयी जागृत झाला तर फसवणुकीच्या प्रकरणांवर नियंत्रण मिळविणे शक्य असून, अशाप्रकारे ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे येणाऱ्या तक्रारींच्या संख्येतही आपोआपच घट होईल, असे प्रतिपादन नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी केले.मविप्रच्या इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर येथे सोमवारी (दि.२४) ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या नाशिक शाखेतर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक मार्गदर्शन केंद्राचे व संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद बांधकाम सभापती मनीषा पवार, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विभागीय अध्यक्ष बाबा जोशी, मार्तंड जोशी, दत्ता शेळके, सुधीर काटकर, अरुण भार्गवे, सुरेशचंद्र धारणकर आदी उपस्थित होते. मिलिंद सोनवणे म्हणाले, सध्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाक डे मोठ्या प्रमाणात ग्राहक फसवणुकींची प्रकरणे प्रलंबित असून, नवीन प्रकरणांची यात भर पडत आहे. ही संख्या कमी करण्यासाठी ग्राहकांची जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्राहक हितासाठी प्रयत्न करणाºया संघटनांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, ग्राहक जागृती रॅली, पथनाट्यांचे सादरीकरणही करण्यात आले.यावेळी महानगरप्रमुख अ‍ॅड. सुरेंद्र सोनवणे सचिव सुरेश धारणकर, तालुका संघटक उल्हास शिरसाट, अ‍ॅड. राजेंद्र शेवाळे, प्रशांत देशमुख, वंदना जगताप, अ‍ॅड. शिवप्रसाद राणा, हेमंत साळी आदी उपस्थित होते.अर्थव्यवस्थेच्या पंचप्राण पुरस्काराचे वितरणशेतकरी, व्यापारी, कारखानदार, श्रमिक व ग्राहक यांचा त्यांनी त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी २०१८ चे ‘अर्थव्यवस्थेचे पंचप्राण’ या पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. यात मालेगावच्या टाकळी येथील माणिकराव शिवाजी अहिरे यांना आदर्श शेतकरी, नाशिकचे रोहित वैशंपायन यांना आदर्श व्यापारी, आशिष नहार यांना आदर्श कारखानदार, प्रशांत देशमुख यांना आदर्श श्रमिक व इगतपुरीचे अविनाश कासार यांना आदर्श ग्राहक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :consumerग्राहकNashikनाशिक