पाण्याच्या टाकीचे बांधकाम ढासळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 13:35 IST2018-11-22T13:35:17+5:302018-11-22T13:35:28+5:30
औंदाणे : केवळ आठ दिवसांपूर्वीच केलेल्या पाण्याचे टाकीचे बांधकाम ढासळल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यकत केला जात आहे.

पाण्याच्या टाकीचे बांधकाम ढासळले
औंदाणे : केवळ आठ दिवसांपूर्वीच केलेल्या पाण्याचे टाकीचे बांधकाम ढासळल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यकत केला जात आहे.
येथील ग्रामपंचायतीने चौदा वित्त आयोगातून गांवाला पाणीपुरवठा करणारी सुमारे पाच हजार लिटर पाण्याचे टाकीचे आठ दिवसापुर्वीच काम केले व पहिल्याच दिवशी दहा लिटर पाणी टाकताच मध्यभागीच बाधकांम ढासळले. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर हतीनदीत असुन पहिली जुनी पाणीपुरवठा करणारी सुमारे पाच हजार लिटरची पाण्याची टाकी आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये म्हणून ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून नवीन पाच हजार लिटर पाण्याच्या टाकीचे बांधकाम आठ दिवसापूवीर् केले मात्र पहिल्याच दिवशी दहा लीटर पाणी टाकताच मध्यभागी बाधकांम ढासळले. पाणी वाया गेले. पाण्याच्या टाकीला फाउंडेशन मजबुत न बांधल्याने व स्टिल कमी प्रमाणात वापरल्यामुळे बांधकाम पडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महिला व मुले येथे पाणी भरण्यासाठी येतात पुर्ण बांध काम पडले असते तर मोठा अनर्थ घडला असता. नवीन पाण्याची टाकीचे बांधकाम मजबुत करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.