शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

संविधान हेच माझे शस्त्र : दुर्गा गुडिलू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:54 IST

जातपंचायतीच्या दहशतीखाली जगणाऱ्या वैदू समाजाला त्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी लढा उभारणाºया मुंबईच्या जोगेश्वरी येथील युवा समाजसेवक दुर्गा गुडिलू यांना ‘नयनतारा सहगल प्रेरणा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नाशिक : जातपंचायतीच्या दहशतीखाली जगणाऱ्या वैदू समाजाला त्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी लढा उभारणाºया मुंबईच्या जोगेश्वरी येथील युवा समाजसेवक दुर्गा गुडिलू यांना ‘नयनतारा सहगल प्रेरणा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.शहरातील गीताई फाउण्डेशनच्या वतीने गीताबाई देवराम आहिरे स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणाºया पुरस्काराचे हॉली क्रॉस चर्चमध्ये शनिवारी (दि.२१) वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार अ‍ॅड. सुरेश भटेवरा, महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळाच्या (मासूम) संस्थापक डॉ. मनीषा गुप्ते, कीर्ती चाबुकस्वार आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मानचिन्ह, मानपत्र, अकरा हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. दुर्गा यांनी आपल्या मातोश्री अंकुबाई गुडिलू यांच्या सोबतीने मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.यावेळी दुर्गा म्हणाल्या, समाजातील अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरेविरुद्ध लढताना पुरुषी मानसिकतेचा मला सर्वाधिक त्रास सहन करावा लागला, मात्र लढ्यात मी संविधानाला शस्त्र बनविले. लहानपणापासूनच समाजात घडणाºया वाईट गोष्टींची मनात चीड निर्माण झाली होती. चळवळींचे आकर्षण असल्याने परिवर्तनाची मशाल पेटविण्याची खूणगाठ बांधली आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरले. आमचा वैदू समाज हा भटक्या विमुक्तांमधील असून, या समाजाच्या शिक्षणापासूनच्या विविध समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी माझी लढाई निरंतर सुरू राहणार आहे. ‘गीताई’चा आशीर्वाद आणि सहगल पुरस्कार मला यासाठी बळ देणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला. दरम्यान, भटेवरा यांनीही समाजातील वाईट प्रवृत्तींवर प्रकाश टाकला.यावेळी चळवळीतील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. फाउण्डेशनच्या अनिता पगारे यांनी प्रास्ताविक केले. मनोहर अहिरे यांनी सूत्रसंचालन तर आभार कल्याणी पगारे यांनी मानले.वैदू समाजात परिवर्तनाची मशाल पेटविणाºया दुर्गाचे कार्य अलौकिक आहे. या समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा, चालीरितींविरुद्ध लढा देणे इतके सोपे नव्हते; मात्र दुर्गाने आपल्यातील दुर्गारूप दाखवून देत अन्यायाला वाचा फोडली. तळागाळातील समाजाला मूळ प्रवाहात आणणाऱ्यांच्या पाठीशी ‘गीताई’सारख्या विविध संस्थांनी उभे काळाची गरज आहे.- सुरेश भटेवरा, ज्येष्ठ पत्रकार

टॅग्स :Nashikनाशिक