अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. आर. डी. आगवाने उपस्थित होते. कार्यक्र माची सुरु वात दीप प्रज्वलन व संविधान वंदनाने करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. प्रा. आगवाने यांनी विद्यार्थ्यांना राज्यघटना निर्मिती प्रक्रि या, राज्यघटनेवरील प्रभाव, संविधान सभा, घटना समिती या माध्यमातून भारतीय संविधानाची निर्मिती कशा पद्धतीने झाली हे स्पष्ट केले.भारतीय राज्यघटनेचे अंतरंग उलगडताना त्यांनी संघराज्य, नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य, संघराज्य व केंद्र सरकार , राज्य शासन, अनुसूची, पंचायतराज, संघराज्य, वाणिज्य, व्यापार, निवडणुका, राजभाषा, आणीबाणी व संकीर्ण याबाबत सविस्तर विवेचन केले. प्राचार्य डॉ. शिंदे यांनी भारतीय संविधानातील नागरिकांचे मूलभूत अधिकार, हक्क, कर्तव्य, समानता याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.आर. व्ही.पवार यांनी केले. या कार्यक्र मात संबंध फाउंडेशन दिल्ली आयोजित तंबाखूमुक्ती कार्यक्र मात राष्ट्रीय सेवा योजना विभागाने घेतलेल्या सक्र ीय सहभागाबद्दल महाविद्यालयास मिळालेल्या सिल्वर मेडल आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. राहुल शंकर उकाडे, प्रकाश बनगया व प्रा. एस. बी. कर्डक यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ.सुरेखा जाधव यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. एस.बी कर्डक यांनी केले.
सिन्नर महाविद्यालयात संविधान दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 18:00 IST