इंधन दरवाढीविरोधात कॉँग्रेसचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 16:39 IST2020-06-29T16:38:58+5:302020-06-29T16:39:16+5:30
मनमाड : केंद्र सरकारचा निषेध

इंधन दरवाढीविरोधात कॉँग्रेसचे धरणे
मनमाड : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निच्चांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होवू देत नाही. उलट सलग १९ दिवसापासून पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत वाढच केली जात आहे .कोरोनामुळे जगणे मुश्कील झाले असताना सदरची इंधन दरवाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी असल्याचा आरोप करत शहर काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष अफजल शेख यांच्या नेतृत्वाखाली एकात्मता चौकात करण्यात आलेल्या या आंदोलनात इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच केंद्र सरकारच्या बेजबाबदार कार्यशैली मुळे चीनचे सैन्य भारतीय हद्दीत शिरले . यात भारताचे २० जवान शहीद झाले. या घटनेचा या वेळी कडकडीत निषेध करण्यात आला. पक्षाच्या वतीने मंडल अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी समाधान पाटील, दर्शन आहेर, रहेमान शाह, संजय निकम,सुनील गवांदे, मिलिंद उबाळे,बाळासाहेब साळुंके,नाझीम शेख, भीमराव जेजुरे ,फिकरराव शिवदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.