नाशिकमध्ये स्मार्ट पार्कींगच्या मुद्यावरून कॉँग्रेस रस्त्यावर उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 18:58 IST2019-07-25T18:56:37+5:302019-07-25T18:58:45+5:30
नाशिक : महपाालिकेच्या मालकीच्या रस्त्यांवर परस्पर स्मार्ट पार्कींग सुरू करण्यात आल्याने नगरसेवक अंधारात असून ज्यांच्या दुकानांसमोर पार्कींग करण्यात आले आहेत, असे दुकानदार त्रस्त झाले आहेत. लोकमतने या विषयावर आवाज उठवल्यानंतर आता प्रदेश कॉँग्रेसच्या प्रवक्ता आणि डॉ. हेमलता पाटील यांनी देखील या विषयावर नागरकीक आणि दुकानदारांना संघटीत करून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरीकांना भुर्दंड तर आहेच परंतु वसुलीच्या नावाखाली शहरात अशांतता निर्माण होणार असल्याने कंपनीच्या बेलगाम कारभाराला पायबंद घालावा यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी गुरूवारी (दि.२५) पत्रकार परिषदेत दिली.

नाशिकमध्ये स्मार्ट पार्कींगच्या मुद्यावरून कॉँग्रेस रस्त्यावर उतरणार
नाशिक : महपाालिकेच्या मालकीच्या रस्त्यांवर परस्पर स्मार्ट पार्कींग सुरू करण्यात आल्याने नगरसेवक अंधारात असून ज्यांच्या दुकानांसमोर पार्कींग करण्यात आले आहेत, असे दुकानदार त्रस्त झाले आहेत. लोकमतने या विषयावर आवाज उठवल्यानंतर आता प्रदेश कॉँग्रेसच्या प्रवक्ता आणि डॉ. हेमलता पाटील यांनी देखील या विषयावर नागरकीक आणि दुकानदारांना संघटीत करून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरीकांना भुर्दंड तर आहेच परंतु वसुलीच्या नावाखाली शहरात अशांतता निर्माण होणार असल्याने कंपनीच्या बेलगाम कारभाराला पायबंद घालावा यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी गुरूवारी (दि.२५) पत्रकार परिषदेत दिली.
यासंदर्भात त्यांनी दोन लाख पत्रके जनजागृतीसाठी वाटण्याचा निर्णय घेतला आहे त्यातील पन्नास हजार पत्रके देखील वाटली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
शहरात गेल्या काही दिवसांपासून रस्त्याच्या कडेला पट्टे मारून पार्कींगचे डिजीटल फलक लावले जात आहेत. सदरचे फलक हे पार्कींगच असले तरी महापालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटी कंपनीकडून कोणत्याही प्रकारची माहिती यासंदर्भात मिळाली नाही, असे पाटील यांनी संगितले.
मुळात रस्त्यावर पार्कींग अनुज्ञेय नाही. मात्र असे करताना त्यासाठी नागरीकांना पंधरा ते पन्नास रूपयांपर्यंत प्रत्येकवेळी भुर्दंड सोसावा लागणार आहे. पार्कींग साठी नाशिकमध्ये यापूर्वी खून होण्यापर्यंत प्रकार घडले आहेत. त्यामुळे आतही वसुलीतून गुंडगिरी बोकाळणार आहे. मुळात कंपनीला जागा आणि दर ठरविण्याचा देखील अधिकार नाही. त्यामुळे सर्व स्मार्ट पार्कींगहा विषयच बेकायदेशीर आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.
महापालिकेत याबाबत महासभेत कोणताही विषय आलेला नसताना काही उपसूचना घुसवण्यात आल्या आणि गोंधळात पार पडलेल्या महासभेत भाजपाचे सध्याचे गटनेते जगदीश पाटील तसेच मुकेश शहाणे यांनी पार्कींगच्या दराची एक उपसूचना दिली आहे. याबाबत देखील सर्व नगरसेवक अंधारात आहे, असा आरोप करीत शहराला पार्कींग हवी असेल तर वाहनतळासाठी आरक्षीत जागा किंंवा खासगी भूखंडधारकांशी करार करून वाहनतळ करावेत, अशी मागणीही डॉ. पाटील यांनी केली आह