प्रियंका गांधी यांच्या अटकेचा कळवण काँग्रेसकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 01:02 IST2021-10-06T01:02:07+5:302021-10-06T01:02:35+5:30
कळवण येथे काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक करून लोकशाही तत्त्वाला हरताळ फासण्याचे काम केले. या मुद्द्यावरून मंगळवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयाच्या पायरीवर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून तीव्र निषेध नोंदवला.

----------------- प्रियंका गांधी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ नायब तहसीलदारांना निवेदन देताना यशवंत गवळी, महेंद्र हिरे, मयूर बहिरम, केदा सोनवणे, सागर जगताप, मनोहर पवार आदी.
कळवण : येथे काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक करून लोकशाही तत्त्वाला हरताळ फासण्याचे काम केले. या मुद्द्यावरून मंगळवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयाच्या पायरीवर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योगी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून तीव्र निषेध नोंदवला. यावेळी नायब तहसीलदार यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव यशवंत गवळी व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र हिरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव यशवंत गवळी, तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, नगराध्यक्ष मयूर बहिरम, शहराध्यक्ष सागर जगताप, पंकज जाधव, केदा सोनवणे, मनोहर पवार, सचिन जाधव, मोठाभाऊ शिंदे, केदा शिंदे, नरेंद्र भावसार, कुंदन बस्ते, रामा पाटील आदी उपस्थित होते.