पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात निफाडला काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:40 IST2021-02-18T21:41:39+5:302021-02-19T01:40:30+5:30
निफाड : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने सामान्य नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. या इंधन दरवाढीच्या विरोधात निफाड तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पेट्रोल पंपांवर निदर्शने करण्यात आली.

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात निफाडला काँग्रेसची निदर्शने
निफाड : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने सामान्य नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. या इंधन दरवाढीच्या विरोधात निफाड तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पेट्रोल पंपांवर निदर्शने करण्यात आली.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुचाकी वाहन पेट्रोल पंपांपर्यंत ढकलत नेत इंधन दरवाढीचा निषेध करत आंदोलन केले. याप्रसंगी निफाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुकर शेलार, जिल्हा सरचिटणीस सचिन होळकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन खडताळे व जिल्हा सरचिटणीस विनायक शिंदे, संपत कराड, कैलास आव्हाड,अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष राजेश लोखंडे, मिराण पठाण,भाऊसाहेब शिंदे,जावेद मणियार,जावेद शेख,दीपक कुंदे, बाबासाहेब सोमवंशी, राहुल नागरे, नजीर बालम, आतिष गायकवाड, तौसिफ राजे, सुरज साळवे, अमन शेख, निखिल निकाळे,रोशन सोनवणे, दुर्योधन गांगुर्डे, राहुल पवार, संतोष पठाडे, कुणाल साळवे,अल्ताफ तांबोळी, विकास पांगारकर आदी उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.