वाकडी येथील घटनेचा काँग्रेस पक्षातर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:04 IST2018-06-18T00:04:30+5:302018-06-18T00:04:30+5:30
वाकडी (ता. जामनेर) येथील दोन मुलांना मारहाण करण्यात आली. या अमानुष घटनेबद्दल काँग्रेस जिल्हा कमिटीतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

वाकडी येथील घटनेचा काँग्रेस पक्षातर्फे निषेध
नाशिक : वाकडी (ता. जामनेर) येथील दोन मुलांना मारहाण करण्यात आली. या अमानुष घटनेबद्दल काँग्रेस जिल्हा कमिटीतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी सदर घटना असून, या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. अॅट्रॉसिटी कायदा कमकुवत केल्याने त्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, राजेंद्र बागुल यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना देण्यात आले. यावेळी नगरसेवक वत्सला खैरे, आशा तडवी, सुनील आव्हाड, रामदास कातकाडे, उद्धव पवार, कल्पना पांडे उपस्थित होते.