काँग्रेस सदस्य  अज्ञातस्थळी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:26 AM2018-05-14T00:26:40+5:302018-05-14T00:26:40+5:30

येत्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या काँग्रेसने आपल्या सदस्यांना रविवारी दुपारनंतर पर्यटनासाठी अज्ञातस्थळी रवाना केले. राष्टवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुफ्ती मोहंमद इस्माईल व नगरसेवक एजाज बेग यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज नाशिक येथे भेट घेऊन चर्चा केली.

Congress members leave for unknown places | काँग्रेस सदस्य  अज्ञातस्थळी रवाना

काँग्रेस सदस्य  अज्ञातस्थळी रवाना

Next

आझादनगर : येत्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या काँग्रेसने आपल्या सदस्यांना रविवारी दुपारनंतर पर्यटनासाठी अज्ञातस्थळी रवाना केले. राष्टवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुफ्ती मोहंमद इस्माईल व नगरसेवक एजाज बेग यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज नाशिक येथे भेट घेऊन चर्चा केली.  विधान परिषदेची २१ मे रोजी निवडणूक होत आहे. यात सेनेचे नरेंद्र दराडे, राष्टÑवादीचे अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांच्यासह अपक्ष उमेदवार परवेज कोकणी अशी तिरंगी लढत होत आहे. यामुळे तिन्ही उमेदवारांसाठी स्वपक्षासह आणखी काही सदस्य गळाला लागतात का? यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे नाशिक महानगरपालिके नंतर सदस्यसंख्या (८९) असलेल्या मालेगाव मनपाच्या सदस्यांकडे तीनही उमेदवारांचा डोळा आहे. खबरदारी म्हणून काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना पर्यटनासाठी अज्ञात ठिकाणी रवाना केले. राष्टÑवादीचे अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल व नगरसेवक एजाज बेग यांनी आज पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. येत्या एक-दोन दिवसात अन्य पक्षांचेही सदस्य अज्ञातस्थळी रवाना होण्याची शक्यता आहे.

Web Title: Congress members leave for unknown places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.