शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

कॉँग्रेस आघाडीचा संयुक्त प्रचार सभेचा बेत फसला

By श्याम बागुल | Published: October 18, 2019 3:54 PM

काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने समविचारी पक्षांना एकत्र घेत या निवडणुकीत आघाडी केली असून, आघाडीचा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध करण्याबरोबरच काही मतदारसंघात संयुक्त प्रचार सभा घेण्याचेही ठरविण्यात आले होते. नाशिक दौऱ्यावर आलेले राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील तसे संकेत दिले होते.

ठळक मुद्देस्वतंत्र प्रचारावर भर : कॉँग्रेस नेते मतदारसंघात अडकले उमेदवार निश्चितीत दोन्ही कॉँग्रेसमध्ये अखेरपर्यंत घोळ सुरू राहिला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीत युतीविरुद्ध एकास एक लढत देण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र करून निर्माण झालेल्या कॉँग्रेस आघाडीने निवडणुकीत एकत्र प्रचार करण्याचे ठरविलेले असताना प्रत्यक्षात मात्र राज्यात कोठेही दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांची संयुक्त प्रचार सभा होवू शकलेली नाही. कॉँग्रेसचे राज्यातील नेते स्वत:च आपल्या मतदारसंघात प्रचारात अडकून पडल्यामुळे ते राज्यात प्रचाराला बाहेर पडू शकले नाहीत, परिणामी राष्टÑवादीलाही स्वतंत्रपणे प्रचार करावा लागला.

काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने समविचारी पक्षांना एकत्र घेत या निवडणुकीत आघाडी केली असून, आघाडीचा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध करण्याबरोबरच काही मतदारसंघात संयुक्त प्रचार सभा घेण्याचेही ठरविण्यात आले होते. नाशिक दौऱ्यावर आलेले राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील तसे संकेत दिले होते. निवडणुकीचे जागावाटप झाल्यानंतर राज्यातील सहा विभागात कॉँग्रेसचे राहुल गांधी, प्रियंका गांधी अथवा सोनिया गांधी यांच्यासमवेत राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या नेत्यांच्या संयुक्त सभा घेण्याचे नियोजन सुरू असल्याचे पवार यांनी म्हटले होते. प्रत्यक्षात जागावाटप व त्यानंतर उमेदवार निश्चितीत दोन्ही कॉँग्रेसमध्ये अखेरपर्यंत घोळ सुरू राहिला त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांकडे अवघे पंधरा दिवस शिल्लक असल्याने त्यांना नेत्यांच्या प्रचार सभांमध्ये अडकवून ठेवणे योग्य नसल्याचा मत प्रवाह पुढे आला. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी मात्र उमेदवार जाहीर झाल्यानंतर तत्काळ राज्यव्यापी दौ-याला सुरुवात करून राज्य पिंजून काढण्यास सुरुवात केली. पक्षाचे अन्य नेत्यांनीही आपापल्या व लगतच्या जिल्ह्यात प्रचारसभा घेऊन वातावरण तापविले. कॉँग्रेसचे नेते मात्र आपापल्या मतदार संघात अडकून पडले. पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे संगमनेर मतदारसंघात, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमध्ये व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये उमेदवारी करीत असल्याने त्यांना सत्ताधारी पक्षांनी अकडवून ठेवले. कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी हे ऐन निवडणुकीत बॅँकॉकला गेले व तेथून परतल्यावर त्यांनी हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्राधान्य देऊन महाराष्टÑात एकमेव सभा घेतली. परिणामी कॉँग्रेसचे राज्यातील उमेदवार आपापल्या बळावरच निवडणुकीला सामोरे जात आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी सायंकाळी संपुष्टात येत असताना आदल्या दिवसांपर्यंत संयुक्त प्रचारसभेचे कोणतेही नियोजन नव्हते. राष्टÑवादीचे शरद पवार हे शुक्रवारी सातारा दौ-यावर होते व तेथून ते पुणे जिल्ह्यात जाणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक