शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

भुजबळ यांच्या सल्ल्याने  ठरणार कॉँग्रेसचे उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 02:06 IST

राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पक्षांतराची विरोधकांकडून चर्चा झडवली जात असताना दुसरीकडे भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राष्टवादीबरोबरच कॉँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या ‘भुजा’त बळ भरण्यास सुरुवात केली आहे.

नाशिक : राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पक्षांतराची विरोधकांकडून चर्चा झडवली जात असताना दुसरीकडे भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राष्टÑवादीबरोबरच कॉँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या ‘भुजा’त बळ भरण्यास सुरुवात केली आहे. कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी गुप्त चर्चा करून भुजबळ यांनी ‘मनात काही ठेवू नका’ असा निरोप देत काही मतदारसंघांत कॉँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांना सर्वोपरि मदत करण्याचा शब्द दिला आहे.गेल्या चार दिवसांपासून छगन भुजबळ नाशकात तळ ठोकून असून, मित्रपक्षांसोबत विधानसभा निवडणुकीची राजकीय व्यूहरचना करीत आहेत. राष्टÑवादीतील अनेक आमदारांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षापासून फारकत घेतल्याने होऊ घातलेली विधानसभा निवडणूक राष्टÑवादी कॉँग्रेससाठी अधिक महत्त्वाची आहे. त्यासाठी पक्षाच्या आदेशावरून भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्णातील राष्टÑवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांचा शोध घेण्याबरोबरच मित्रपक्ष कॉँग्रेसचीही अप्रत्यक्ष जबाबदारी उचलली आहे.चांदवडमधील एका माजी आमदाराने भुजबळ यांची भेट घेऊन निवडणूक लढविण्याबाबत सल्ला घेतला आहे. भुजबळ यांनीदेखील जागावाटपात काय होते ते बघू, परंतु एकसंघ होऊन काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. रविवारी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही भुजबळ यांची भेट घेऊन विधानसभा निवडणुकीची चर्चा केली. सुमारे अर्धातास ‘बंद खोलीत’ सुरू असलेल्या या चर्चेत नेमके काय ठरले हे कळू शकले नसले तरी, निवडणुकीविषयी कॉँग्रेसची सध्याची तयारी, संभाव्य उमेदवार व त्यांची राजकीय गणिते भुजबळ यांनी जाणून घेतली.जागावाटपाची लवकरच घोषणा होईल, त्यानुसार दोन्ही पक्षांनी एकदिलाने काम करण्याचे त्याचबरोबर मनात काही ठेवू नका, काही मदत लागली तर सांगा असा निरोपही कॉँग्रेसच्या नेत्यांना भुजबळ यांनी दिला.इगतपुरी, चांदवड मतदारसंघाकडे लक्षइगतपुरी मतदारसंघ जागावाटपात कॉँग्रेसला सुटणार असला तरी, येथील कॉँग्रेसच्या आमदाराने सेनेत प्रवेश केल्याने कॉँग्रेसकडे या मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्याचे पाहून भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा परिषदेचे एका सदस्याला कॉँग्रेसमध्ये पाठविण्यात भुजबळ यांनीच मोठी भूमिका बजावल्याची चर्चा होत आहे. या इच्छुकाने कॉँग्रेस प्रवेश करताच, त्यांना पक्षाकडून उमेदवारीचा शब्द मिळवून देण्यात भुजबळ यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले जात असून, असाच प्रकार चांदवड मतदारसंघातील संभाव्य उमेदवाराबाबत घडला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसChagan Bhujbalछगन भुजबळ