बोगस बियाणांची मांडळी व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:15 IST2021-09-19T04:15:46+5:302021-09-19T04:15:46+5:30
त्यानंतर पुढील आठ दिवसात शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असे कृषिमंत्र्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सुनावले. शेतकऱ्यांना कृषी विभागाने दिलेली बाजरीची बियाणे ...

बोगस बियाणांची मांडळी व्यथा
त्यानंतर पुढील आठ दिवसात शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असे कृषिमंत्र्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सुनावले. शेतकऱ्यांना कृषी विभागाने दिलेली बाजरीची बियाणे बोगस निघाली, परंतु कंपनीकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्यास टाळाटाळ होत असून शनिवारी कृषिमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना आठ दिवसात भरपाई मिळणार या आशेवर शेतकरी आहेत.
सटाणा कृषी विभागाने केलेला पंचनाम्यामध्ये ६५ टक्के नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. परंतु शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धनशक्ती कंपनीने चार वेळा पंचनामा करूनदेखील कुठलाही निकष न काढता शेतकऱ्यांची थट्टा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान कृषिमंत्री भुसे यांची भेट घेऊन निवेदन देण्यासाठी शेतकरी नाना बच्छाव, वसंत बच्छाव, भास्कर गांगुर्डे, दिलीप पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.
चौकट...
सटाणा कृषी विभागाकडून सहकार्य मिळत आहे परंतु धनशक्ती कंपनीकडून शेतकऱ्यांची नुकसान होऊनदेखील थट्टा केली जात आहे. नाना बच्छाव शेतकरी जुनी शेमळी
कोट...
कंपनीचे अधिकारी चार वेळा शेतात येऊनदेखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास देण्यास टाळाटाळ करत आहेत. आधीच बोगस बियाणे निघाल्यामुळे नुकसान आणि आता अधिकाऱ्यांकडे नुकसान भरपाईसाठी शेतीचे काम सोडून धावपळ करावी लागत आहे.
- वसंत बच्छाव, शेतकरी, जुनी शेमळी.
(१८ जुनी शेमळी)
जुनी शेमळी येथील बाजरी बोगस बियाणेबाबत दादा भुसे यांना निवेदन देताना नाना बच्छाव, वसंत बच्छाव, भास्कर गांगुर्डे, दिलीप पवार.
180921\18nsk_35_18092021_13.jpg
जुनी शेमळी येथील बाजरी बोगस बियाणे बाबत दादा भुसे यांना निवेदन देताना नाना बच्छाव, वसंत बच्छाव, भास्कर गांगुर्डे, दिलीप पवार.