घोटी बाजारपेठेत दुकानदार,विक्रेत्यांमध्ये संभ्रमावस्था कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 01:00 IST2021-04-07T22:13:43+5:302021-04-08T01:00:05+5:30
घोटी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ह्यब्रेक दि चेनह्ण उपक्रम शासनाने सुरू करून महाराष्ट्रात कडक निर्बंध लादले आहे. या बंधनामुळे किरकोळ दुकानदार, लहानसहान व्यावसायिकांचेच व्यवसाय बंद ठेवण्यात आल्याने इगतपुरी तालुक्यातही नाराजीचा सूर उमटत आहे.

घोटी बाजारपेठेत दुकानदार,विक्रेत्यांमध्ये संभ्रमावस्था कायम
घोटी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ह्यब्रेक दि चेनह्ण उपक्रम शासनाने सुरू करून महाराष्ट्रात कडक निर्बंध लादले आहे. या बंधनामुळे किरकोळ दुकानदार, लहानसहान व्यावसायिकांचेच व्यवसाय बंद ठेवण्यात आल्याने इगतपुरी तालुक्यातही नाराजीचा सूर उमटत आहे.
संकटकाळात आमचेच व्यवसाय बंद ठेऊन आमच्यावरच उपासमारीची वेळ आल्याची गावपातळीवरचे लहान व्यावसायिक व मजूरवर्गाने म्हटले आहे. नेमके कोणते व्यवसाय बंद आणि कोणते चालू याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने हातावर पोट असणाऱ्यांचेच हाल होत आहे. हे कसले कडक निर्बंध हे तर लॉकडाऊनच केल्याची भावना बंद ठेवण्यात आलेले दुकानदार व मजूर वर्गाने केली आहे. एकाबाजूला लॉकडाऊन सारखी स्थिती,त्यात महिनाभर व्यवसाय बंद, महागाई, बंद ठेवलेल्या दुकानाचे भाडे, लाईट बिल, मुलांच्या शाळेची फी हा आर्थिक भार कुठून सहन करायचा, असा प्रश्नही या व्यावसायिकांनी केला आहे.
रोजगाराअभावी उपासमारीची वेळ
रस्त्यावर चहा, खाद्यपदार्थ, छोटे, लहान व्यवसाय, सलून दुकाने यांच्यावर मोठे संकट उभे ठाकले आहे तसेच बहुतांश दुकाने बंद असल्याने अनेक दुकानांतील मजूर, कामगार यांनाही रोजगाराअभावी उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने दखल घेऊन लॉकडाऊनमध्ये सुटसुटीतपणा असावा अशी मागणी करण्यात येत आहे. हातावर पोट असणाऱ्यांचा तालुक्यात मोठा वर्ग असून हा कामगार, मजूर, व्यावसायिक आज चिंतेत पडला आहे. त्यात लहान-सहान दुकानदारांवरच बंधने, निर्बंध असून मास्क नसला तरी दंडही अन दंडुकाही त्यालाच. या संकटकाळात व्यावसायिकांवर असलेली बंधने काहीशी शिथील करावीत. नियमांचे पालन करून बंद केलेले काही दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली.