किसान सन्मान योजनेबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 07:20 PM2021-02-04T19:20:27+5:302021-02-05T00:12:22+5:30

पागोरी पिंपळगाव : किसान सन्मान योजनेचे पैसे मिळण्यास विलंब लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सुरुवातीला काही हप्ते मिळाले परंतु अलीकडे पैसे जमा होत नसल्याने या योजनेविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

Confusion about Kisan Sanman Yojana | किसान सन्मान योजनेबाबत संभ्रम

किसान सन्मान योजनेबाबत संभ्रम

Next
ठळक मुद्देकिसान सन्मान योजनेचे पैसे मिळविण्यासाठी ग्रामस्थ बँकेत चकरा मारत आहेत.

पागोरी पिंपळगाव : किसान सन्मान योजनेचे पैसे मिळण्यास विलंब लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सुरुवातीला काही हप्ते मिळाले परंतु अलीकडे पैसे जमा होत नसल्याने या योजनेविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

किसान सन्मान योजनेचे पैसे मिळविण्यासाठी ग्रामस्थ बँकेत चकरा मारत आहेत. यापूर्वी आधारकार्ड नंबर आणि खाते क्रमांक चुकल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. शासनाच्या चुकांचा तोटा सहन करावा लागत आहे. शासनस्तरावर देखील याची कोणीच दखल घेत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने २०१९ मध्ये केली होती. या अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात.

Web Title: Confusion about Kisan Sanman Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.