नाशिकरोड : मनपा नाशिकरोड प्रभाग सभापतिपदाच्या झालेल्या निवडणुकीत नगरसेवक विशाल संगमनेरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.नाशिकरोड प्रभाग सभापतिपदाची निवडणूक प्रभाग समिती सभागृहात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रभाग सभापतिपदासाठी नगरसेवक विशाल संगमनेरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज होता. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नाशिकरोड प्रभाग सभापती म्हणून संगमनेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घोषित केले.त्यानंतर महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते जगदीश पाटील आदींसह नगरसेवक यांनी संगमनेरे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी नगरसेवक सत्यभामा गाडेकर, अनिता सातभाई, डॉ. सीमा ताजणे, मीराबाई हांडगे, रंजना बोराडे, सुनीता कोठुळे, जयश्री खर्जुल, संभाजी मोरुस्कर, बाजीराव भागवत, शरद मोरे, सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, केशव पोरजे, पंडित आवारे, अंबादास पगारे आदी उपस्थित होते. संगमनेरे यांच्या निवडीनंतर ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
नाशिकरोडला संगमनेरे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:19 IST