शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
2
सुरक्षा दलाचे सर्वांत मोठे यश ! ५०० जवानांचा बळी घेणारा जहाल नक्षल कमांडर 'हिडमा'चा खात्मा ; १० कोटींचे होते इनाम
3
"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर
4
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
5
VIRAL : आयुष्यातील पहिलीच नोकरी अन् अवघ्या तीन तासांनंतरच दिला राजीनामा! असं नेमकं झालं काय? 
6
Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
7
मुंबईकरांची धावपळ! शहरात CNG पुरवठा अचानक ठप्प; ऑटो-टॅक्सीची लांबच लांब रांग, कधीपर्यंत दुरुस्त होणार?
8
"मी तशी नाही…" वादग्रस्त प्रकरणावर व्यक्त होताना बांगलादेशी कर्णधाराने घेतलं हरमनप्रीतचं नाव
9
रेखा झुनझुनवालांनी 'या' बँकेतील हिस्सा वाढवला, शेअर्सनं गाठला नवा उच्चांक; किंमत २४५ रुपयांच्या पार
10
Mumbai Traffic: एलबीएस मार्गावर आता 'गेम चेंजर' पूल; ४० मिनिटांचे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार!
11
Mumbai Indians मधून बाहेर पडताच Arjun Tendulkar ची धडाकेबाज कामगिरी, साकारलं अनोखं शतक
12
Stray Dogs: लाखभर भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारणार कुठे? पालिकेसमोर मोठे आव्हान
13
SIP मध्ये 'ही' चूक कराल तर मोठं नुकसान! फक्त ३ पेमेंट मिस झाल्यास १.५ लाख रुपये बुडतील; पाहा गणित
14
Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
15
‘साधी एक चिपही बनवता येत नाही, अमेरिकन नागरिक काय कामाचे?’, डोनाल्ड ट्रम्प संतापले, ‘या’ देशाकडून शिकण्याचा दिला सल्ला 
16
अमित शाहांनी दिलेली 30 नोव्हेंबरची डेडलाइन; त्यापूर्वीच सुरक्षा दलांनी हिडमाला संपवले..!
17
आधी बोगस डॉक्टर, नंतर जादूटोण्यावर ठेवला विश्वास; तापाने फणफणलेल्या ३ मुलांनी गमावला जीव
18
Vegetable Rates: भाजीपाल्याने गाठली शंभरी; गवार १६०, मटार १३० रुपये किलो!
19
भारताचा मध्यमवर्ग संकटाच्या उंबरठ्यावर; २ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका
20
त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप ना कसली चिंता; दिल्ली स्फोटातील आरोपीला भेटल्यानंतर वकील म्हणाले.. 
Daily Top 2Weekly Top 5

‘कश्यपी’बाबत प्रशासन , लोकप्रतिनिधी यांच्यातच  मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:19 IST

कश्यपी धरणग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याच्या प्रश्नावर महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातच मतभेद असल्याचे उघड झाले असून, गेल्या आठवड्यात प्रकल्पग्रस्तांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेतले जाणार नाही,

नाशिक : कश्यपी धरणग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याच्या प्रश्नावर महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातच मतभेद असल्याचे उघड झाले असून, गेल्या आठवड्यात प्रकल्पग्रस्तांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेतले जाणार नाही, अशी भूमिका आयुक्तांनी घेतलेली असताना, तत्पूर्वीच २०१७ मध्ये महासभेने कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर ठराव करून शासनाच्या अनुमतीने ३६ प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामवून घेण्याचा ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठविण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न पुन्हा महापालिकेच्या कोर्टात गेला आहे.प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे, वाढीव मोबदला मिळावा आदी मागण्याच्या पूर्ततेसाठी प्रकल्पग्रस्तांनी १५ आॅगस्ट रोजी कश्यपी धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला असून, त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात आली. त्यात महापालिकेने प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्याचा ठराव करावा, अशी भूमिका जिल्हाधिकाºयांनी मांडली असता, महापालिकेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना पत्र देऊन कश्यपी धरणाच्या पाण्याचा कोणताही लाभ पाटबंधारे खात्याकडून मिळत नसल्याने धरणग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात येणार नसल्याचे आयुक्तांच्या पत्रान्वये स्पष्ट करण्यात आले होते. महापालिकेच्या या पत्रामुळे धरणग्रस्तांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक चंद्रकांत खाडे यांनी महापालिकेच्या महासभेचा दि. २० सप्टेंबर २०१७ रोजीचा ठराव क्रमांक ७५९ची प्रत मिळविली असता, त्यात महासभेने ३६ प्रकल्पग्रस्तांच्या यादीतून पात्र व्यक्तींची निवड करण्याची कार्यवाही करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे.परस्परविरोधी भूमिकाप्रकल्पग्रस्तांच्या नियुक्त्या जाहिरातीशिवाय व त्यांची सेवा प्रवेश अर्हता, गुणवत्ता न डावलता करता येणार नाही, असे नमूद करून महापालिकेचा आस्थापना खर्चाची मर्यादा ३५ टक्के ठेवण्यात आली असल्यामुळे नवीन पदांची भरती करता येत नसली तरी, शासनाकडून त्याबाबत सूट घेऊन मान्यता दिल्यास ३६ प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्याचा ठराव मंजूर केला आहे. सदर ठराव नगरसचिवांच्या स्वाक्षरीनिशी शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. असे असताना आयुक्तांनी थेट कश्यपी प्रकल्पग्रस्तांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात येणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींची परस्पर विरोधी भूमिका समोर आली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDamधरण