शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापनासाठी पथकांची निश्चिती

By admin | Updated: March 29, 2015 00:45 IST

कुंभमेळा : ६ एप्रिलपासून पथकांचे प्रशिक्षण

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात संभाव्य आपत्तीचे निराकरण करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांतर्गत शोध व बचाव पथकांची निश्चिती करण्यात आली असून, शनिवारी त्या संदर्भात बैठक होऊन पथकात सहभागी होणाऱ्या सदस्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम घोषित करण्यात आला. कुंभमेळ्यात तीन शोध व बचाव पथके कार्यरत राहणार असून, या पथकांना आवश्यक असलेले प्रशिक्षण एनडीआरएफ मार्फत देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रशिक्षकांचे प्रशिक्षण होणार असून, ते इतर पथकांना प्रशिक्षण देतील. प्रत्येक पथकात अग्निशमन दलाचे बारा, पोलीस विभागाचे बारा, पाच होमगार्ड, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी पाच, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दोन, नायब तहसीलदार दोन आणि महानगरपालिका आणि नगरपालिका प्रशासनाचा प्रत्येकी एक सदस्य अशा प्रकारे ४० सदस्यांचा समावेश असेल. या पथकाला विविध आपत्तींना सक्षमपणे सामोरे जाण्याचे प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले. या प्रशिक्षणाशिवाय रेडक्रॉस संस्थेमार्फत संदर्भ सेवा रुग्णालय येथे दहा पथकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यात प्रत्येक पथकात ५० सदस्यांचा समावेश असेल, या पथकांमध्ये प्रामुख्याने एनसीसी, एनएसएस आणि पोलीस जवानांचा समावेश करण्यात येणार आहे. मेडिकल फर्स्ट रेस्पॉँडर म्हणून आरोग्य विभागाच्या चार पथकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक पथकात ५० प्रशिक्षणार्थींचा समावेश असेल. नर्सिंग महाविद्यालयाच्या सभागृहात हे प्रशिक्षण देण्यात येईल या शिवाय टप्पाटप्प्याने पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य, संचार व संवाद, विद्युतपुरवठा, रिलीप कॅम्प आदि विविध बाबींचे प्रशिक्षणही तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत देण्यात येणार आहे. महसूल, आरोग्य, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, महावितरण, असे सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित सर्व यंत्रणांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणात सहभागी करून घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी विविध विभागांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत केलेल्या सूक्ष्म नियोजनाची माहिती एकत्रित करण्यात येत असून, त्या आधारे एकत्रित नियोजन करण्यात येणार आहे. त्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीस जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, सहायक पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, यशदाचे कर्नल विश्वास सुपणेकर, एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट सच्चिदानंद गावडे, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उदय किसवे, सह निबंधक रमेश काळे, आरोग्य उपसंचालक डॉ. डी. बी. पवार, पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे आदि उपस्थित होते. प्रशिक्षण देण्यापूर्वी एनडीआरएफचे प्रशिक्षण देणारे अधिकारी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील महत्त्वाच्या ठिकाणी भेट देणार आहेत. (प्रतिनिधी)