Conference organized by Maharashtra Children's Education Council | महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेतर्फे परिषदेचे आयोजन

महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेतर्फे परिषदेचे आयोजन

नाशिक : महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेतर्फेदि. १ ते ३ नोव्हेंबर रोजी त्र्यंबकरोड येथील इस्पॅलियर हेरिटेज स्कूल येथे बालशिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बालविकासासाठी आम्ही’ या विषयावर ही परिषद होत असून, त्यात शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ आणि प्रयोगशील शिक्षक सहभागी होणार आहेत.
या परिषदेत मुंबई येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे, सुचिता पडळकर, डॉ. वर्षा कुलकर्णी, डॉ. हेमंत सोननीस, डॉ. दिनेश नेहते, बाळकृष्ण बोकील, डॉ. मुक्ता बालिगा, डॉ. रु बी पवार, अजित टक्के, सचिन जोशी, उत्तम कांबळे आदी मान्यवर या तीनदिवसीय परिषदेत विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत अनुभवावर आधारित विविध शोधनिबंधांचे सादरीकरण केले जाणार आहे. बालशिक्षण परिषदेत लहान वयातील मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक विकास या विषयांवर सहभागी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
विशेष म्हणजे या परिषदेत पालकांनादेखील सहभागी होता येणार आहे अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.

Web Title: Conference organized by Maharashtra Children's Education Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.