सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत कार्तिक वारी व बाल आनंद मेळानिमित्त बालगोपाल वैष्णवांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान केली होती. विद्यार्थिनी व विद्यार्थी तुळशी वृंदावन, कलश, पताका घेऊन दिंडीत सहभागी झाले होते. गावातून बालगोपाल वैष्णवांच्या दिंडीची मिरवणूक काढण्यात आली. टाळमृदंगाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी पांडुरंग आंबेकर, राजेंद्र देवरे, विजय खैरनार, कल्पना खैरनार, वैशाली वालझाडे, सुमन क्षीरसागर, निर्मला दिघे, कुंदा फणसे उपस्थित होते.
वैष्णवांच्या दिंडीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 16:55 IST