वैष्णवांच्या दिंडीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 16:55 IST2019-11-27T16:53:44+5:302019-11-27T16:55:28+5:30

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत कार्तिक वारी व बाल आनंद मेळानिमित्त बालगोपाल वैष्णवांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान केली होती.

 Conducting the Dindhi of Vaishnavas | वैष्णवांच्या दिंडीचे आयोजन

--------------------- भरवीर येथील शाळेच्या वतीने काढलेली बालगोपाल वैष्णवांची दिंडी.


सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत कार्तिक वारी व बाल आनंद मेळानिमित्त बालगोपाल वैष्णवांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान केली होती. विद्यार्थिनी व विद्यार्थी तुळशी वृंदावन, कलश, पताका घेऊन दिंडीत सहभागी झाले होते. गावातून बालगोपाल वैष्णवांच्या दिंडीची मिरवणूक काढण्यात आली. टाळमृदंगाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी पांडुरंग आंबेकर, राजेंद्र देवरे, विजय खैरनार, कल्पना खैरनार, वैशाली वालझाडे, सुमन क्षीरसागर, निर्मला दिघे, कुंदा फणसे उपस्थित होते.
 

Web Title:  Conducting the Dindhi of Vaishnavas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.