शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

शिवसेना-राष्ट्रवादीच्या जवळीकीने भाजपच्या गोटात चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 00:12 IST

मिलिंद कुलकर्णी ​​​​​​​महाविकास आघाडी म्हणून राज्य सरकारमध्ये एकत्र असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ह्यतुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेनाह्ण असे नाते तयार झाले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीतही हे दिसून आले. निफाडमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादीविरोधात विजय मिळवला तर दिंडोरीत एकमेकांविरोधात लढूनदेखील नगराध्यक्ष निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे प्रयत्न आहेत. पेठमध्ये राष्ट्रवादीने सेनेची सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजप व अपक्षांची मदत घेतली आहे. सुरगाण्यात राष्ट्रवादीचा एकमेव नगरसेवक भाजप किंवा शिवसेनेचा नगराध्यक्ष होणार हे ठरविण्याच्या स्थितीत आहे. अशीच स्थिती नाशिक महापालिका निवडणुकीत आहे. सेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेतल्याने आघाडीच्या चर्चेला पेव फुटले. राष्ट्रवादीला केवळ २० जागा देण्याची तयारी सेनेने दाखविल्याची बातमी आली आणि आघाडीची चर्चा या टप्प्यावर पोहोचल्याचे पाहून भाजप गोटात खळबळ माजली.

ठळक मुद्देकाँग्रेसचा निर्णय होईना; मंत्र्यांसह आमदार लागले निवडणुकीच्या तयारीलास्थानिक राजकारण पक्षभेदापलीकडे

मिलिंद कुलकर्णीमहाविकास आघाडी म्हणून राज्य सरकारमध्ये एकत्र असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ह्यतुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेनाह्ण असे नाते तयार झाले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीतही हे दिसून आले. निफाडमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादीविरोधात विजय मिळवला तर दिंडोरीत एकमेकांविरोधात लढूनदेखील नगराध्यक्ष निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे प्रयत्न आहेत. पेठमध्ये राष्ट्रवादीने सेनेची सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजप व अपक्षांची मदत घेतली आहे. सुरगाण्यात राष्ट्रवादीचा एकमेव नगरसेवक भाजप किंवा शिवसेनेचा नगराध्यक्ष होणार हे ठरविण्याच्या स्थितीत आहे. अशीच स्थिती नाशिक महापालिका निवडणुकीत आहे. सेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेतल्याने आघाडीच्या चर्चेला पेव फुटले. राष्ट्रवादीला केवळ २० जागा देण्याची तयारी सेनेने दाखविल्याची बातमी आली आणि आघाडीची चर्चा या टप्प्यावर पोहोचल्याचे पाहून भाजप गोटात खळबळ माजली.स्थानिक राजकारण पक्षभेदापलीकडेराष्ट्रीय, राज्याचे राजकारण सध्या सगळेच बघत आहोत. त्याच्या उलट स्थानिक पातळीवर राजकारण सुरू आहे. विचारधारा, बांधीलकी याच्या पलीकडे जाऊन केवळ सत्तेचे राजकारण तेथे सुरू आहे. सुरगाण्यात भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला. त्यांना बहुमताच्या नऊ जागांसाठी केवळ एका नगरसेवकाच्या समर्थनाची आवश्यकता आहे. शिवसेनेचे सहा नगरसेवक असून, त्यांना माकपच्या दोन सदस्यांनी समर्थन दिल्याची चर्चा आहे. भाजप व सेनेचे समान बळ झाल्याने राष्ट्रवादीचा एकमेव नगरसेवक काय भूमिका घेतो, यावर कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष होईल, हे ठरणार आहे. अशीच स्थिती दिंडोरीमध्ये आहे. तेथे शिवसेनाकाँग्रेसची आघाडी होती. दोघांचे आठ नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक निवडून आले; पण नगराध्यक्षपदाचे आरक्षण असलेल्या अनुसूचित जमातीचा एकही नगरसेवक त्यांच्याकडे नाही. भाजपचे चार नगरसेवक निवडून आले, तरीही त्यांनी नगराध्यक्षपदासाठी आशा कराटे यांना उतरवले आहे. त्यामुळे आघाडीतील घटक पक्षांच्या भूमिकेचा खुलासा दि. १५ रोजी होईल.इच्छुक अनेक रोटेशनचा जुमलानगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत राजकीय पक्षांनी जुमला करीत कायदेशीर व राजकीय परिस्थितीवर मात केल्याचे दिसून आले. निफाडमध्ये स्थानिक आघाडीला बहुमत मिळाले. नगराध्यक्षपद महिला राखीव निघाले. आघाडीच्या पाच नगरसेविका इच्छुक होत्या. शिवसेनेच्या रूपाली रंधवे यांना पहिल्यांदा संधी देत उर्वरित चौघींना उरलेल्या दोन वर्षांत रोटेशननुसार संधी देण्यात येणार आहे. सगळे खुश. योगायोग म्हणजे विरोधी बाकावर असलेल्या राष्ट्रवादीकडे एकही महिला नगरसेविका नाही. देवळ्यातही रोटेशनचा जुमला भाजप अमलात आणणार आहे. खुल्या महिला वर्गासाठी नगराध्यक्षपद राखीव आहे. भाजपकडे ८ नगरसेविका आहेत. पहिल्यांदा भारती आहेर यांना संधी देण्यात आली. उर्वरित कालावधीत रोटेशनचा जुमला आहेच. एकापेक्षा अधिक इच्छुक असल्याने राजकीय पक्षांनी हा तोडगा काढला आहे. मात्र, सहा-आठ महिन्यांच्या कालावधीत नगराध्यक्ष हा त्या पदाला किती न्याय देऊ शकेल, हा प्रश्न उरतोच. सेना-राष्ट्रवादीची आघाडी होईल?शिवसेनेचे आमदार सुहास कांदे, आमदार दराडे यांचा राष्ट्रवादीचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत रंगलेला कलगीतुरा, भुजबळ-राऊत यांच्यातील जुगलबंदी पाहता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थानिक पातळीवर एकत्र येण्याची शक्यता धूसर वाटत होती. मात्र, सेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शिवसेनेने यापूर्वीच १०० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यादृष्टीने तयारीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीला सोबत घेऊन महापालिकेत सत्ता हस्तगत करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ३५, तर राष्ट्रवादीचे ६ नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहून २० जागांचा प्रस्ताव सेनेने दिला असल्याची बातमी बाहेर आली. दोन्ही पक्षांच्या चर्चेचे केंद्र हे मुंबईत आहे. आदित्य ठाकरे, संजय राऊत, छगन भुजबळ, अजित पवार यांच्यात चर्चा झाल्यास एकमत होऊ शकते, असे मानले जाते.५० जागांचे भाजपचे सर्वेक्षण?भाजपमध्ये सर्वेक्षणाला मोठे महत्त्व अलीकडे प्राप्त झाले आहे. हायटेक प्रचारयंत्रणेचा भाग म्हणून त्याकडे बघितले जाते; परंतु या सर्वेक्षणाच्या नावाने अनेकांची उमेदवारी कापण्याचे प्रकारदेखील घडल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सर्वेक्षणाविषयी साशंकता व्यक्त होत असते. असेच सर्वेक्षण नाशिक महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने करण्यात आल्याची चर्चा आहे. मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आमदार, नगरसेवक व इच्छुक उमेदवार व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात सर्वेक्षणातून आलेला ५० चा आकडा सांगण्यात आला आणि बहुमताचा आकडा गाठण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना करण्यात आली. भाजपमधून नगरसेवकांची गळती होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी आमदारांकडे पक्षांतर रोखण्याची जबाबदारी सोपवली आहे. मुळात २०१७ मध्ये अन्य पक्षांतून आलेल्या आयारामांना सांभाळून ठेवण्याची अवघड कसोटी आमदार कसे निभावतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.मालेगावात राष्ट्रवादी जोरातकाँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या महापौर ताहेरा शेख यांनी मालेगावात धडाका लावला आहे. महापालिकेचे कामकाज असो की, पक्षसंघटनेचे कार्य असो, त्यांनी पुढाकार घेत स्वकीयांसह विरोधकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. हिजाब प्रकरणातील त्यांची सक्रियता एमआयएमच्या आमदारांची चिंता वाढविणारी आहे. राष्ट्रवादी युवक संघटनेच्या माध्यमातून आधी मोर्चा काढून कर्नाटकातील घटनेचा निषेध मालेगावात करण्यात त्यांनी अग्रभाग घेतला. महिला मेळावा, हिजाब दिवस याद्वारे त्यांनीही शक्तिप्रदर्शन केले. आमदारांनीही या घटनेचा निषेध करीत आक्रमक भूमिका घेतली. या विषयावरून राष्ट्रवादी व एमआयएम हे पक्ष आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. कर्नाटकातील विषयांवरून महाराष्ट्रात वाद होऊ नये, धर्मा-धर्मात दुही पडू नये, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. एकीकडे सरकार म्हणून पक्षाचे मंत्री आवाहन करीत असले तरी पक्षात नुकत्याच आलेल्या महापौर आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. आगामी महपाालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीकडे कानाडोळा करून कसे चालेल?

 

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेसMalegaonमालेगांव