पिंपळादेवी यात्रा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:51 IST2019-05-11T17:51:00+5:302019-05-11T17:51:15+5:30

मालेगाव : तालुक्यातील माळमाथा भागातील कौळाणे (गा.) येथे पिंपळादेवीची दोन दिवशीय यात्रा संपन्न झाली. यात्राकाळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Completed Pimpalevi Tour | पिंपळादेवी यात्रा संपन्न

पिंपळादेवी यात्रा संपन्न

मालेगाव : तालुक्यातील माळमाथा भागातील कौळाणे (गा.) येथे पिंपळादेवीची दोन दिवशीय यात्रा संपन्न झाली. यात्राकाळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी अक्षय तृतीयेच्या तिसऱ्या दिवशी यात्रा भरत असते. मालेगाव पासून साधारण ३० कि.मी. अंतरावर असलेल्या कौळाणे (गा.) गावातील होळी चौकात असलेल्या ग्रामदैवत पिंपळादेवी मंदिरा परिसरात यात्रा भरत असते. गुरूवारी सकाळी पिंपळादेवीचे विधीवत जलाभिषेक व पूजन करुन यात्रोत्सवाला सुरूवात करण्यात आली. दुपारी ४ वाजता गावातुन तगतराव रथाची तमाशा कलावंतांसह मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विठ्ठल मंदिरासमोरील चौकात तमाशा कलावंतांचा हजेरीचा कार्यक्रम झाला. रात्री भिका भिमा यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री झालेल्या लोकनाट्य तमाशा पाहण्यासाठी गाव परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Completed Pimpalevi Tour

टॅग्स :Fairजत्रा