बालकांना सकस पोषण आहार मिळत नसल्याच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 00:40 IST2021-02-08T21:23:59+5:302021-02-09T00:40:26+5:30
नांदगाव : शहरातील शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील लहान बालकांना सकस पोषण आहार मिळत नसल्याने कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनला असल्याच्या प्रकाराकडे येथील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. विद्या कसबे यांनी महिला बालविकास मागासवर्गीय कल्याण खात्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचे लक्ष वेधले.

बालकांना सकस पोषण आहार मिळत नसल्याच्या तक्रारी
नांदगाव : शहरातील शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील लहान बालकांना सकस पोषण आहार मिळत नसल्याने कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनला असल्याच्या प्रकाराकडे येथील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. विद्या कसबे यांनी महिला बालविकास मागासवर्गीय कल्याण खात्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचे लक्ष वेधले.
कडू यांची ॲड. विद्या कसबे, ॲड. अरुणा वाठोरे, ॲड. रंजना गायकवाड यांनी औरंगाबाद येथे भेट घेतली. गेल्या १५ वर्षांतील लहान मुलांच्या जन्मदराचा आधार घेऊन नवीन अंगणवाड्यांची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, महिला बालकल्याण प्रकल्पाकडून नियोजित आराखड्याशिवाय नव्या अंगणवाड्या मंजूर होत नसल्याचे सांगण्यात आले. त्वरित सर्वेक्षण करून नवीन अंगणवाड्यांना मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी ॲड. विद्या कसबे यांनी केली आहे.
नव्या अंगणवाडी बृहत आराखड्यात नांदगाव शहराचा अंतर्भाव केल्यास गुलजारवाडी, ढासेमळा, बौद्धनगर, कैलासनगर व इतर भागांत नव्या अंगणवाड्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन बच्चू कडू यांनी महिलांच्या शिष्टमंडळाला दिले.