सातबारा आॅनलाईन मिळत नसल्याची महसूल मंत्र्यांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:37 IST2020-08-20T21:48:09+5:302020-08-21T00:37:16+5:30
बेलतगव्हाण विहीतगाव शिगवेबहुला सह पंचक्रोशीतील सातबाऱ्यावर बालाजी देवस्थानचा उल्लेख असल्याने सातबारे आॅनलाईन पद्धतीने मिळत नसल्याने शेतकर्यांसह प्लॉट धारकांची अडचण लक्षात घेता या गावांचे सातबारे आॅनलाईन पद्धतीने मिळण्याची मागणी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे थोरात यांनी आश्वासित केले आहे.

सातबारा आॅनलाईन मिळत नसल्याची महसूल मंत्र्यांकडे तक्रार
देवळाली कँम्प : बेलतगव्हाण विहीतगाव शिगवेबहुला सह पंचक्रोशीतील सातबाऱ्यावर बालाजी देवस्थानचा उल्लेख असल्याने सातबारे आॅनलाईन पद्धतीने मिळत नसल्याने शेतकर्यांसह प्लॉट धारकांची अडचण लक्षात घेता या गावांचे सातबारे आॅनलाईन पद्धतीने मिळण्याची मागणी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे थोरात यांनी आश्वासित केले आहे.
राज्यात आॅनलाइन सातबारा उतारा मिळत असला तरी, नाशिक तालुक्यातील विहितगाव, बेलतगव्हाण, शिगवे बहुला या गावांचे सातबारा उतारे आॅनलाईन मिळत नाही. तलाठींकडून सातबारा मिळण्यास उशीर होतो,आॅनलाइन सातबारे मिळाले तर कामांची दिंरगाई होत असल्याची तक्रार आमदार सरोज अहिरे यांनी महसूल मंत्री थोरात यांच्या कडे केली. यावेळी संजय हांडोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेवक राहुल दिवे , ज्ञानेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते.