सरकारी कामात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 17, 2015 22:25 IST2015-12-17T22:24:27+5:302015-12-17T22:25:47+5:30
सरकारी कामात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल
चांदवड : येथील पेट्रोलपंप चौफुलीवर मद्य सेवन करून वेगाने गाडी चालवून पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ केल्याने सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार येथील पोलीस स्थानकात दाखल झाली आहे.
येथील दत्तात्रेय बाळासाहेब अहेर हा गुरुवारी (दि. १७) दुपारी २ वाजेच्या सुमारास वेगाने मोटारसायकल चालवित होता. त्यास पोलीस कर्मचारी कुमार गायकवाड यांनी हटकले असता दत्तू अहेर याने त्यांना शिवीगाळ केली. याबाबत सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव, श्रीकांत आहिरे करीत आहेत. (वार्ताहर)