नांदगावी पत्नीची पतीविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 23:24 IST2018-12-02T23:24:14+5:302018-12-02T23:24:53+5:30

नांदगाव : दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याकारणाने पतीकडून छळ होत असल्याची फिर्याद पत्नीने नांदगाव पोलिसांत दिली आहे. भालूर येथील निकम परिवारातील सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन महिलांचा समावेश आहे.

Complaint against the wife of a ninth wife | नांदगावी पत्नीची पतीविरोधात तक्रार

नांदगावी पत्नीची पतीविरोधात तक्रार

ठळक मुद्देसहा जणांविरूद्ध गुन्हा

नांदगाव : दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याकारणाने पतीकडून छळ होत असल्याची फिर्याद पत्नीने नांदगाव पोलिसांत दिली आहे. भालूर येथील निकम परिवारातील सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन महिलांचा समावेश आहे. फिर्यादी स्वाती संपत निकम ह. मु. बाणगाव यांना घरातील काम जमत नाही, शेतीची कामे येत नाहीत अशी कुरापत काढून अनेकवेळा सारसच्यांनीा मारहाण केली. लग्नाच्या वेळी पाहुण्यांना अपमानस्पद वागणूक दिली, मानपान दिला नाही या कारणाने तिचा छळ करत होते.
रोजच्या मारझोडीला कंटालेल्या स्वाती निकम यांनी मालेगाव महिला शिकायत केंद्रात तक्रार अर्ज सादर केला. मात्र त्यांच्यात समझोता घडून आला नाही. महिला तक्र ार निवारण विभागाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्र ार देण्यास सांगितले. त्यानंतर पीडित महिलेने सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दाखल केली. संपत निकम (पती), गणपत निकम (भाया), शांताबाई निकम (जाऊ), अहल्याबाई निकम (सासू), भाऊसाहेब निकम( सासरे, सर्व, रा. भालूर) व नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी, हवालदार रमेश पवार करीत आहेत.

Web Title: Complaint against the wife of a ninth wife