शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

सदनिका जप्तीमध्ये बँकेने  वस्तू सील केल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:49 AM

थकीत गृहकर्जापोटी अभ्युदय बँकेने जप्त केलेल्या सदनिकेसोबत जीवनावश्यक वस्तूही बँकेने सील केल्या असून, या वस्तू परत मिळाव्यात यासाठी बँकेकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही या वस्तू परत केल्या जात नसल्याची तक्रार सुनील मधुकर सूर्यवंशी (रा़ बी ४५, दुर्गानगर, क़ का़ वाघ महाविद्यालयामागे) यांनी पोलीस आयुक्त व आडगाव पोलीस ठाण्यात केली आहे़

नाशिक : थकीत गृहकर्जापोटी अभ्युदय बँकेने जप्त केलेल्या सदनिकेसोबत जीवनावश्यक वस्तूही बँकेने सील केल्या असून, या वस्तू परत मिळाव्यात यासाठी बँकेकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही या वस्तू परत केल्या जात नसल्याची तक्रार सुनील मधुकर सूर्यवंशी (रा़ बी ४५, दुर्गानगर, क़ का़ वाघ महाविद्यालयामागे) यांनी पोलीस आयुक्त व आडगाव पोलीस ठाण्यात केली आहे़ बँकेने केवळ सदनिका जप्त करणे आवश्यक असताना जीवनावश्यक वस्तूही अडकवून ठेवल्याने कु टुंबाचे हाल होत असून, याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा निबंधक तसेच मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली आहे़तक्रारदार सूर्यवंशी यांनी दिलेल्या निवेदनानुसार पंचवटीतील वाघ महाविद्यालयाजवळील जय दुर्गानगर को आॅप. हौसिंग सोसायटीत बी-४५ हे रो-हाउस खरेदी केले आहे़ यासाठी अभ्युदय बँकेच्या पेठरोड शाखेने २०१५ मध्ये सूर्यवंशी यांना १५ लाख रुपये गृहकर्ज दिले़ मात्र, सदर रो-हाउस हे डेव्हलपरने मूळ मालकास विक्री केल्यानंतर पुन्हा परस्पर दुसऱ्यास व दुसºयाने सूर्यवंशी यांना विक्री केले. ही बाब पंचवटी शाखेतील बँकेच्या अधिकाºयांना माहिती असतानाही त्यांनी गृहकर्ज देऊन फसवणूक केल्याचे निवेदनात म्हटले आहे़अभ्युदय बँकेने सूर्यवंशी यांनी कर्जाचे हप्ते थकविल्याने रो-हाउस जीवनावश्यक वस्तूंसह सील केले़ यानंतर संबंधित घरातघरफोडी होऊन सूर्यवंशी यांचे सोन्याचे दागिने व वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या़ याबाबत बँकेने आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे़ दरम्यान, बँकेने जीवनावश्यक वस्तू व चोरी गेलेला मुद्देमाल परत करावा यासाठी ते बँक, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस ठाण्याच्या चकरा मारत असून, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे़वस्तू देण्यास तयारबँकेच्या मुख्य कार्यालयाकडे गृहकर्जाच्या वसुलीसाठी हे प्रकरण आहे़ या ठिकाणी झालेल्या घरफोडीची आम्ही आडगाव पोलिसांकडे रीतसर तक्रार केली असून, जीवनावश्यक वस्तू द्यायला आम्ही तयार आहोत़ एकदा आम्ही घर उघडून दिले मात्र ते घराबाहेरच निघत नव्हते़ त्यामुळे जिल्हाधिकाºयांनीही सांगितले आहे की रीतसर आॅर्डर आणा, आम्ही वस्तू द्यायला तयार आहोत, आम्हाला केवळ प्रॉपर्टी हवी आहे़  - सूर्यकांत प्रभू, बँक अधिकारी, अभ्युदय बँक, नाशिक

टॅग्स :bankबँकHomeघरNashikनाशिक