जादा पैशांची आकारणी केली जात असल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:41 IST2019-06-27T00:38:11+5:302019-06-27T00:41:41+5:30
चांदवड : येथील वजन मापे नोंदणी केंद्रावर काटे मापे नोंदणी करताना जादा दराने फी आकारली जात असल्याची तक्रार येथील व्यापाऱ्यांनी केली आहे.

जादा पैशांची आकारणी केली जात असल्याची तक्रार
चांदवड : येथील वजन मापे नोंदणी केंद्रावर काटे मापे नोंदणी करताना जादा दराने फी आकारली जात असल्याची तक्रार येथील व्यापाऱ्यांनी केली आहे.
चांदवड येथील व्यापाºयांनी केली येथे वजन मापे यांची नोंदणी करण्यासाठी सटाणा येथील सप्तशृंगी स्केल सर्व्हिसेस या इलेक्ट्रॉनिक व मॅकेनिकल काटे मापाचे गव्हमेंट रजिस्टर रिपेअरर्स यांचे तात्पुरते केंद्र येथे आले आहे. प्रत्येक काटे-मापे हे प्रमाणित व नोंदणी करण्याचे काम येथे केले जाते. वजने मापे नोंदणी करण्याची सरकारी फी कमी असताना या कंपनीकडून जादा पैसे आकारले जात आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी चांदवड शहरातील व्यापाºयांनी केली आहे. दरम्यान, याबाबत अधिक चौकशी केली असता २० किलो ते ३०० किलो वजनी काट्याची नोंदणी करण्याची फी शासकीय राजपत्रात ४०० रुपये असताना ही कंपनी अव्वाच्या सव्वा किंमत सुमारे १३०० रुपये आकारत असून, व्यापाºयांची अडवणूक करीत आहेत. तरी या प्रकाराकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी व्यापाºयांनी केली आहे.
याबाबत संबंधिताकडे तक्रार केली असता दुकाने तपासणीची धमकी दिली जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.